एक्स्प्लोर

Sharad Ponkshe and Babasaheb Ambedkar: 'मनुस्मृती वाचली असती तर...' माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पोंक्षे

Sharad Ponkshe Latest news: हिंदू धर्मातील सर्व जाती, पंथ यांच्या भिंती संपून आपण एक हिंदू म्हणून, एक भारतीय म्हणून वज्रमूठ म्हणून एकत्र राहायला पाहिजे हा माझा मूळ हेतू आहे.

Sharad Ponkshe and Babasaheb Ambedkar: मनुस्मृतीमध्ये कुणालाही दुय्यम वागणूक दिलेली नाही. ती जाळणाऱ्यांनीही वाचली नाही. वाचली असती तर ते जाळू शकले नसते, या वक्तव्यावरुन वादंग निर्माण झाल्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी माफी मागितली आहे. 'मूळ मनुस्मृती (Manusmriti) वाचली असती तर ती जाळली नसती', या शब्दामुळे जर माझे बंधू -बांधव दुखावले गेले असतील तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, असे त्यांनी सांगितले. (Sharad Ponkshe News)

शरद पोंक्षे यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन आपली भूमिका मांडली. सध्या माझं एक वक्तव्य मीडिया फिरवतंय. अशी नेहमीच माझी वक्तव्य तोडून-मोडून फोडून मीडियावाले फिरवत असतात. संपूर्ण भाषण कोणी कधी दाखवत नाही. माझ्या भाषणातलं मागचं पुढचं सगळं कापून त्यामुळे समाजात वाद कसा निर्माण होईल, याबद्दल काळजी घेऊन नेहमी माझी वक्तव्यं टाकत असतात. माझी दोन वक्तव्यं त्यांनी चालवलेली. एक मी आरएसएसबद्दल बोललेलो आणि दुसरं मनुस्मृतीजर वाचली असती, तर ती जाळली नसती, असं मी बोललो. आता हे बोलण्याचा माझा उद्देश असा आहे की, हिंदुत्व या विषयावर बोलत असताना, हिंदू धर्मातील जे सगळे धर्मग्रंथ आहेत, भगवद्गीता आहे, रामायण आहे, तर हे सगळं आपण वाचतच नाहीये. हे जर वाचलं तर तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलंय. हा माझा मूळ उद्देश आहे. त्यामुळे मी असं म्हटलं. सगळे वेद, उपनिषदं संपूर्ण भाषण युट्युबवर उपलब्ध आहेत, तुम्ही ते बघू शकता. मनुस्मृती मूळ जर वाचली, त्याची अनेक रूपं झाली. आता बाबासाहेबांनी मनुस्मृती जरी जाळली तरी त्यांनी हिंदू कोड बिल बनवताना मनुस्मृतीचा वापर केलेला आहे, हे त्यांनी स्वतः म्हटलंय, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले.

Sharad Ponkshe: मला व्याख्यान्यासाठी बहुजन लोकांकडूनच जास्त बोलावणे येते: शरद पोंक्षे

मी सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राचा अभ्यास करत आहे. खरे बाबासाहेब लोकांपर्यंत पोहोचावेत, कळावेत, ते कसे होते, ते सांगण्यासाठी माझी धडपड सुरु आहे. काही दिवसांनी ते तुम्हाला दिसेल.  'मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती', या शब्दामुळे जर माझे बंधू -बांधव दुखावले गेले असतील तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. माझा मूळ हेतू आणि मूळ उद्दिष्ट हे आहे की, हिंदू धर्मातील सर्व जाती, पंथ यांच्या भिंती संपून आपण एक हिंदू म्हणून, एक भारतीय म्हणून वज्रमूठ म्हणून एकत्र राहायला पाहिजे हा माझा मूळ हेतू आहे. माझी सगळी व्याख्यानं तुम्ही ऐकू शकता, मी कधी काही लपवत नाही. माझी जास्त व्याख्यानं बहुजन समाजातीलच लोक ठेवतात. काही लोक बावळटासारख्या प्रतिक्रिया देत असतात. पण माझ्या काही चांगल्या मित्रांनी प्रतिक्रिया दिल्यामुळे मला असं वाटलं की, एक व्हिडीओ करावा आणि दिलगिरी व्यक्त करावी. मुळात मी बाबासाहेबांचा, सगळ्या महापुरुषांचा अत्यंत आदर करणारा माणूस आहे. बोलण्याच्या ओघात कधीतरी शब्द निघून जातो. त्यामुळे मनुस्मृतीबाबतच्या वाक्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर मी मनापासून माफी मागतो. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

आणखी वाचा

आम्हाला कुणीच हरवू शकत नाही, आम्हीच सर्वस्वी, या अहंकारात भाजपनं राहू नये; शरद पोंक्षेंचा नागपुरात जाऊन इशारा! 

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget