Shah Rukh Khan Reacted On His Shoulder Injury: दुखापतीनंतर शाहरुख खानच्या खांद्याची मोठी शस्त्रक्रिया, म्हणाला, 'नॅशनल अवॉर्ड उचलण्यासाठी माझा एकच हात पुरेसा...'
Shah Rukh Khan Reacted On His Shoulder Injury: शाहरुख खानला काही दिवसांपूर्वी शुटिंगवेळी खांद्याला दुखापत झालेली. त्यानंतर त्याच्या खांद्याची मोठी शस्त्रक्रिया पार पडली.

Shah Rukh Khan Reacted On His Shoulder Injury: बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aaryan Khan) लवकरच दिग्दर्शक (Director) म्हणून पदार्पण करणार आहे. त्याच्या पहिल्या वहिल्या वेब सीरिजचं (Web Series) नाव 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' (Ba***ds of Bollywood) आहे, जी नेटफ्लिक्सवर (Netflix) रिलीज केली जाणार आहे. आर्यन आणि शाहरुख खानचे चाहते या सीरिजबद्दल खूप उत्सुक आहेत. अलीकडेच या सीरिजचा एक प्रिव्ह्यू लॉन्च इव्हेंट आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये शाहरुख खाननंही हजेरी लावली होती.
शाहरुख खानला काही दिवसांपूर्वी शुटिंगवेळी खांद्याला दुखापत झालेली. त्यानंतर त्याच्या खांद्याची मोठी शस्त्रक्रिया पार पडली. अशातच, बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान बुधवारी पहिल्यांदाच मीडियासमोर आला. त्यावेळी शाहरुखचा एक हात बेल्टनं गळ्यात अडकवलेला होता. यावेळी शाहरुख मीडियासमोर पहिल्यांदाच आपल्या खांद्याच्या दुखापतीबद्दल बोलला.
दुखापतीबाबच किंग खान काय म्हणाला?
2023 च्या 'जवान' चित्रपटासाठी नुकताच किंग खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अशातच, नॅशनल अवॉर्ड जिंकणारा शाहरुख खान मुंबईत त्याचा मुलगा आर्यन खानची डेब्यू वेब सीरिज 'द बास्टर्ड्स ऑफ बॉलीवूड'च्या प्रिव्ह्यू लाँच इव्हेंटमध्ये माध्यमांशी संवाद साधला. हाताला काळा बेल्ट बांधलेला शाहरुख खान सुरुवातीलाच त्याच्या दुखापतीबद्दल बोलला.
View this post on Instagram
'नॅशनल अवॉर्ड उचलण्यासाठी...' : शाहरुख खान
किंग खान म्हणाला की, "सर्वात आधी, तुमच्या सर्वांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं मी देतो... माझ्या खांद्याला दुखापत झाली होती आणि माझी एक छोटी शस्त्रक्रिया झाली, जी प्रत्यक्षात थोडी मोठी होती... मला पूर्णपणे बरं होण्यासाठी काही महिने लागतील... पण, एका हातानंही, मी नॅशनल अवॉर्ड उचलू शकतो..."
2 ऑगस्ट 2025 रोजी शाहरुख खाननं सोशल मीडियावर एक व्हिडीओ स्टेटमेंट शेअर केलं, ज्यामध्ये त्यानं 33 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्याबद्दल आनंद व्यक्त केलेला. तो म्हणालेला की, तो एका हातानं अनेक गोष्टी करू शकतो, जसं की, दात घासणं आणि जेवणं... पण एका गोष्टीसाठी त्याला दोन्ही हातांची आवश्यकता आहे... तो हसत म्हणाला, "ते तुमचे सर्व प्रेम गोळा करत आहेत..."
दरम्यान, जुलैमध्ये, 60 वर्षांचा शाहरुख खान त्याच्या आगामी 'किंग' चित्रपटाच्या सेटवर जखमी झाल्याचं वृत्त समोर आलं. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे आणि त्यात त्याची मुलगी सुहाना खान, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी आणि दीपिका पदुकोण हे स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 71 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा काही महिन्यांत होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, शाहरुख त्याचा मुलगा आर्यन खानचा डेब्यू प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधली अभिनेत्री सहेर बंबा कोण? सनी देओलशी क्लोज कनेक्शन























