एक्स्प्लोर
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधली अभिनेत्री सहेर बंबा कोण? सनी देओलशी क्लोज कनेक्शन
Aryan Khan Web Series: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' वेब सीरिज लवकरच रिलीज होणार आहे. दिग्दर्शक म्हणून आर्यन खानचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे.
Who Is Actress Sahher Bambba
1/8

Who Is Actress Sahher Bambba: शाहरुख खाननं बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून खूप नाव कमावलं. दरम्यान, त्याचा मोठा मुलगा आर्यन खान त्याच्या वडिलांप्रमाणे बॉलिवूडवर राज्य करण्याची इच्छा मनात बाळगून पदार्पण करत आहे.
2/8

पण, आर्यन खान शाहरुख खानसारखा अभिनेता म्हणून नाहीतर. दिग्दर्शक म्हणून त्याच्या कारकीर्दीची सुरुवात करत आहे. आर्यन खाननं एका वेब सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.
3/8

आर्यन खानच्या वेब सीरिजमध्ये सहेर बंबा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पण, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी ही सौंदर्यवती नेमकी कोण?
4/8

आर्यन खानच्या वेब सिरीजचं नाव 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' आहे. या सीरीजचा टीझर 17 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये सहेर बंबा देखील दिसली होती. लक्ष्य लालवानीसोबत सहेर बंबा दिसणार आहे.
5/8

टीझरमध्ये सहेर अभिनेता लक्ष्य लालवानीसोबत दिसली होती. पण ही सहेर बंबा म्हणजे नेमकी कोण? हे सविस्तर जाणून घेऊयात... सहेर बंबाचं सनी देओलसोबत अत्यंत जवळचं नातं आहे.
6/8

सहेर बंबा 26 वर्षांची आहे. तिचा जन्म हिमाचल प्रदेशातील शिमला इथे झाला. तिनं मुंबईतील जय हिंद कॉलेजमधून शिक्षण घेतलंय. तिनं 2019 मध्ये सनी देओल दिग्दर्शित 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून पदार्पण केलं.
7/8

'पल पल दिल के पास'मध्ये सहेर बंबासोबत सनी देओलचा मुलगा करण देओल दिसून आलेला. ही फिल्म बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकली नाही आणि फ्लॉप ठरली.
8/8

आपल्या डेब्यू फिल्म व्यतिरिक्त सहेर बंबा 'द मिरांडा ब्रदर्स' नावाच्या एका फिल्ममध्ये दिसून आली होती. अशातच आता सहेर बंबा शाहरुख खानची प्रोडक्शन कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनणारी सीरिज 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणार आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर आली आहे.
Published at : 18 Aug 2025 10:37 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
पुणे






















