Sudhir Nandgaonkar : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक सुधीर नांदगावकर यांचं निधन; वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sudhir Nandgaonkar Passed Away : सुधीर नांदगावकर यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा चित्रपट संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत केला आहे.
Sudhir Nandgaonkar Passed Away : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, समीक्षक आणि प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक सुधीर नांदगावकर (Sudhir Nandgaonkar) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्या कारणाने त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर दुपारी तीनच्या सुमारास माजीवाडा येथे वास्तव्यास असलेले सुधीर नांदगावकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुधीर नांदगावकर यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा चित्रपट संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत केला. तसेच, जगभरातील चांगल्या दर्जाचे चित्रपट इथल्या मराठी रसिकांना पाहता यावेत आणि त्यावर एकत्रित चर्चा व्हावी यासाठी त्यांनी प्रभात चित्र मंडळ या त्यांच्या फिल्म सोसायटी चळवळीमार्फत बरीच धडपड केली.
प्रभात चित्र मंडळाच्या उभारणीत महत्त्वाचा वाटा
सुधीर नांदगावरकर यांनी हॉलिवूडचे चित्रपट या समाजातून बाहेर काढून जगभरातील चित्रपटांच्या विविध जागतिक प्रवाहांशी मराठी रसिकांना जोडण्याचे काम त्यांनी केले. तसेच, मुंबईतील सर्वात जुनी फिल्म सोसायटी 'प्रभात चित्र मंडळ. या मंडळाच्या वेगवेगळ्या चळवळीतून तसेच उपक्रमातून सुधीर नांदगावकर यांनी चित्रपट माध्यमाचा भरपूर प्रचार केला. आतापर्यंतच्या अनेक चित्रपट महोत्सवात त्यांनी परीक्षक म्हणून काम केलं आहे. प्रसिद्ध मामी फेस्टिव्हल हा नांदगावकर यांच्याच संकल्पनेतून उभा राहिला
सुधीर नांदगावकर यांच्या फिल्म सोसायटी चळवळीचे महत्वाचे पैलू म्हणजे दर्जेदार चित्रपट विषयक मजकूर देणारे 'वास्तव रूपवाणी' हे नियतकालिक. तसेच 'मामी' आणि 'थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव' हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण आणि नावाजलेले दोन चित्रपट महोत्सव. भारतीय आणि जगभरातील विविध क्षेत्रातील आणि प्रवाहातील चित्रपटांचे चित्रीकरण या महोत्सवांमधे करण्यात आले. रसिकांना आणि मराठी चित्रपट सृष्टीतील जाणकारांना ते पाहता आणि अभ्यासता आले.
सुधीर नांदगावरकर यांची कारकिर्द
चित्रपट संस्कृतीचा प्रसार करणारे सुधीर नांदगावकर यांनी एम.ए. ची पदवी मुंबई विद्यापीठातून प्राप्त केली. आचार्य अत्रे यांच्या दै. मराठा मध्ये चित्रपट समीक्षक म्हणून ते उपसंपादक होते. पोतदार महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. सुधीर नांदगावकर यांनी मुंबईत प्रभात मित्रमंडळ ह्या फिल्म सोसायटीची स्थापना केली.
महत्त्वाच्या बातम्या :