एक्स्प्लोर

Sayaji Shinde On CJP Protest: जंतरमंतरवर पोलिसांनी विद्यार्थ्यांना काठ्यांनी झोडपून काढलं, अभिनेते सयाजी शिंदे आक्रमक, म्हणाले, 'व्यक्ती तर बदलला पाहिजेच, सरकारने..'

रितेश देशमुख जेनेलिया देशमुख, शबाना आझमी, प्रकाश राज, अतुल कुलकर्णी, अभिनेत्री ऋतुजा बागवे यांनी आंदोलकांना पाठिंबा दिलाय.  दरम्यान ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे. 

Sayaji Shinde on CJP Protest Jantar Mantar: जंतर-मंतरवर महिनाभरापासूनच (Jantar Mantar Protest) सुरूअसलेल्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधातील  तरुण तरुणी सोमवारी संसदेवर धडकले. नीट परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागलं. जंतर-मंतरवर जमलेल्या तमाम तरुण-तरुणींवर दिल्ली पोलिसांनी बेछूट लाठीचार्ज केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या आंदोलनादरम्यान 100हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी विद्यार्थ्यांना काठ्यांनी झोडपून काढलं. अनेकांची डोकी फुटली. सोमवारी दिवसभर भारताच्या राजधानीत तणावाचं वातावरण होतं. कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) या आंदोलनाला बॉलीवूडसह मराठी आणि दक्षिण भारतीय मनोरंजनसृष्टीतील अनेकांनी पाठिंबा दिला.  रितेश देशमुख जेनेलिया देशमुख, शबाना आझमी, प्रकाश राज, अतुल कुलकर्णी, अभिनेत्री ऋतुजा बागवे यांनी आंदोलकांना पाठिंबा दिलाय.  दरम्यान ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे. 

Sayaji Shinde:काय म्हणाले सयाजी शिंदे?

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी चार्जबाबत ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले ' आपलाच माणसाने आपल्या माणसावर लाठीचार्ज करणं हे बरोबर नाही. शेवटी आपली माणसं आहेत.  चांगल्या कारणासाठी भांडत आहेत. ही लोकशाही आहे. अशा पद्धतीने लाठीचार्ज करणे योग्य नाही. सरकारने विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करायला पाहिजे. म्हणजे आता जी परिस्थिती आहे ते टळेल.' असे सयाजी शिंदे म्हणाले. 

'व्यक्ती बदलला पाहिजेच..'

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अजूनही कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलक तरुण-तरुणी कायम आहेत. यावर बोलताना सयाजी शिंदे म्हणाले 'सिस्टीम बदलली पाहिजे.व्यक्ती तर बदलला पाहिजेच,त्यानेच लक्ष दिलेलं नाही. चांगली व्यक्ती आणि चांगलं सरकार आपण कशासाठी निवडून देतो? आपल्याला  चांगली सर्विस मिळण्यासाठीच ना ..तसं त्यांनी वागलं पाहिजे. तरच अशा पद्धतीचा आंदोलनं होणार नाहीत.' असं सयाजी शिंदे म्हणाले .

ते पुढे म्हणाले 'मी सोनम वांगचुक यांना खरंच मानतो. अशी लोकं दुर्मिळ आहेत. मी प्रत्यक्ष त्यांना भेटलोय. बोललोय. आमचे विचार एकमेकांशी जुळले.असं वाटतं की माणसं आपल्यापेक्षा जास्त चांगली आहे. अशा माणसांच्या आपल्या देशाला गरज आहे. सरकारने सगळ्याच गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आपलं सरकार आहे.आपण निवडून दिलेला आहे, असं नाही चालणार'असंही ते म्हणाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.त्यासाठी 40,000 आमदार आहेत प्रत्येक आमदार 5000 झाडे लावणार असल्याचं सयाजी शिंदे यांनी सांगितलं. एकूण दोन लाख झाडे लावली जाणार असल्याचं ते म्हणाले.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sayaji Shinde On CJP Protest: जंतरमंतरवर पोलिसांनी विद्यार्थ्यांना काठ्यांनी झोडपून काढलं, अभिनेते सयाजी शिंदे आक्रमक, म्हणाले, 'व्यक्ती तर बदलला पाहिजेच, सरकारने..'
जंतरमंतरवर पोलिसांनी विद्यार्थ्यांना काठ्यांनी झोडपून काढलं, अभिनेते सयाजी शिंदे आक्रमक, म्हणाले, 'व्यक्ती तर बदलला पाहिजेच, सरकारने..'
Ramayan Release Date Update: रणबीर कपूरच्या 'रामायण' रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट; 'या' हॉलिवूड सिनेमाशी बॉक्स ऑफिस क्लॅश?
रणबीर कपूरच्या 'रामायण' रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट; 'या' हॉलिवूड सिनेमाशी बॉक्स ऑफिस क्लॅश?
Kushal Badrike On Rahul Deshpande: भाऊ कदमांनी 'तो' प्रश्न विचारताच राहुल देशपाडेंना राग अनावर, अन्...; कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा 'तो' किस्सा
भाऊ कदमांनी 'तो' प्रश्न विचारताच राहुल देशपाडेंना राग अनावर, अन्...; कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा 'तो' किस्सा
Elvish Yadav on CJP protest: 'ना मी BJP समर्थक ना...', CJP आंदोलनावर एल्विश यादवची प्रतिक्रिया चर्चेत, नेटकरी भडकले; इन्फ्ल्युएंसरची घेतली शाळा
'ना मी BJP समर्थक ना...', CJP आंदोलनावर एल्विश यादवची प्रतिक्रिया चर्चेत, नेटकरी भडकले; इन्फ्ल्युएंसरची घेतली शाळा
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
Maharashtra Weather Update: मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Raj Thackeray on Delhi LathiCharge: दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Embed widget