एक्स्प्लोर

Sayaji Shinde : '...तर शरद पवारांकडे गेलो असतो', अजितदादांचं घड्याळ हाती घेताच सयाजी शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदेंचं वक्तव्य चर्चेत आलेलं आहे.

Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी राजकारणात एन्ट्री करत अजितदादांना (Ajit Pawar) साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. पण पक्षप्रवेशला अवघे काही तासच झाले असताना सयाजी शिंदेंच्या वक्तव्याने साऱ्यांचंच लक्ष वेधलं आहे. 'जर आधी मला शरद पवारांनी (Sharad Pawar) बोलावलं असतं तर त्यांच्याकडे गेलो असतो', असं वक्तव्य सयाजी शिंदे यांनी एबीपी माझासोबत बोलताना केलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर प्रत्येक पक्षात इनकमिंग सुरु आहे. त्यातच अनेक कलाकारही त्यांच्या राजकारणाची एन्ट्री फिक्स करतायत. 

दरम्यान सयाजी शिंदे हे स्टार प्रचारक म्हणून काम करतील असं अजित पवारांनी जाहीर केलं आहे. मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत सयाची शिंदे यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते. पण सयाजी शिंदेंच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चा सुरु झाल्यात. 

सयाजी शिंदे यांनी काय म्हटलं?

एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना सयाजी शिंदेंनी म्हटलं की, आधी शरद पवारांनी बोलावलं असतं तर त्यांच्याकडे गेलो असतो. आता एकनाथ शिंदे आणि माझे चांगले संबंध आहेत ते सातारकर आहेत किंवा राज ठाकरे यांच्यासोबत माझं सतत बोलणं होत असतं. परंतु त्यावेळी कधी विचार झाला नव्हता. आता अजित पवार यांना निवडलं म्हणून बाकीचे माझे दुश्मन आहेत असं अजिबात नाही.

व्हायरल व्हिडीओवरही दिली प्रतिक्रिया

सयाजी शिंदेंचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यामध्ये  काय विचारधारा विचारधारा विचारधारा करतोय सत्तेला धरा हीच विचारधारा, असं त्यांनी म्हटलंय. त्यावरही एबीपी माझासोबत बोलताना त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. 'सत्याला धरून जर सत्तेला धरलं तर चांगलं आहे. हेच मी लक्षात घेत मी सत्तेत आलो आहे. राजकारणी जरा फकीरी वृत्ती ठेवावी आणि फकीरांनी जरा राजकारण्यासारखं वागाव जर मी फकीर असेल तर मी थोडा राजकारण्यासारखा वागेल आणि राजकारण्यांना सर्वांचा विचार होईल असं वागावं म्हणजे सगळ्यांचं भलं होईल.' 

'मला अजित पवारांनी बोलावलं मी त्यांच्यासोबत गेलो...'

सयाची शिंदें यांनी म्हटलं की, मी कोणाच्याही चुकांवर पांघरुण घालत नाही. मला जे योग्य वाटतं ते मी करतो मला अजित पवारांनी बोलावलं मी त्यांच्यासोबत गेलो. त्यांनी काही विषय मला सांगितले ते मला योग्य वाटले तर मी ते मांडेल. तुम्हाला दररोज वेगवेगळे प्रकरणे मीडियावरती ऐकायला मिळतात. सोशल मीडियावर आपण न्यायाधीश होण्यापेक्षा न्यायालय या सगळ्या प्रकरणांची चौकशी करेल. 

ही बातमी वाचा : 

सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique Firing: वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं, बाबा सिद्दिकींवर गोळीबार कसा झाला?
वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं, बाबा सिद्दिकींवर गोळीबार कसा झाला?
Uddhav Thackeray Dasara Melava : चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Uddhav Thackeray Dussehra Rally : भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baba Siddique : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यूUddhav Thackeray Full Speech : मोदींची मिमिक्री, RSSला सवाल; उद्धव ठाकरे यांचं दमदार भाषण ABP MAJHABaba Siddique Firing : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवर 3 जणांकडून गोळीबारEknath Shinde Speech Dasara Melava : होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique Firing: वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं, बाबा सिद्दिकींवर गोळीबार कसा झाला?
वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं, बाबा सिद्दिकींवर गोळीबार कसा झाला?
Uddhav Thackeray Dasara Melava : चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Uddhav Thackeray Dussehra Rally : भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray Dasara Melava : ... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
Gulabrao Patil : कव्वा कबुतर नही बन सकता, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
कव्वा कबुतर नही बन सकता, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
Uddhav Thackeray: तुला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी निवडलंय, तुला योग्य वाटेल तेच कर; रतन टाटांचा ठाकरेंना मोलाचा सल्ला
तुला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी निवडलंय, तुला योग्य वाटेल तेच कर; रतन टाटांचा ठाकरेंना मोलाचा सल्ला
Sanjay Raut Dasara Melava 2 महिन्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री या व्यासपीठावर; संजय राऊतांचा CM पदावर दावा, मेळाव्यातून शिंदेंवर जोरदार हल्ला
2 महिन्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री या व्यासपीठावर; संजय राऊतांचा CM पदावर दावा, मेळाव्यातून शिंदेंवर जोरदार हल्ला
Embed widget