मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, जिगरी दोस्तासाठी सयाजी शिंदेंनी बुक केलं खासगी चार्टर्ड प्लेन VIDEO
Sayaji Shinde booked a private chartered plane : मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, जिगरी दोस्तासाठी सयाजी शिंदेंनी बुक केलं खासगी चार्टर्ड प्लेन VIDEO

Sayaji Shinde booked a private chartered plane : कधी व्हीलन, कधी कॉमेडिअन विविध भूमिकांमधून आपल्या प्रत्येकाच्या घरातघरात पोहोचलेलं नाव म्हणजे सयाजी शिंदे... हेच सयाजी शिंदे सामाजिक उपक्रम मग ते झाडं लावणं.. असो की नशामुक्ती अभियान कायम हिरीरिने भाग घेतात...याच सयाजी शिंदेंचं आणखीन एक वेगळंपण समोर आलं..ते म्हणजे त्यांनी आपल्या बालमित्राला एक मोठ्ठ सरप्राईज दिलं...आणि सर्वांनाच थक्क करुन सोडलं...
इतकी प्रसिद्धी मिळत असूनही मैत्रीतला धागाही हळुवारपणे जपत असल्याचं सयाजी शिंदे यांनी दाखवून दिलं...सयाजी शिंदेंचा साताऱ्यातील बालमित्र शिवाजीराव यांनी एकदा विमानातून प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली होती...मित्राची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी सयाजी शिंदेंनी चक्क खासगी चार्टर्ट फ्लाईट बूक केलं आणि मित्राला सफर घडवली...
अभिनेते सयाजी शिंदेंनी आपल्या बालमित्रासोबत विमानाने जळगाव ते नाशिक असा प्रवास केला.. धुक्यात हरवलेल्या रस्त्यांचा, पावसाचा, डोंगर धबधब्यांचा मनमुराद आनंद घेत ऐकमेकांच्या सहवासात आणि प्रवासात या दोन मित्रांमध्ये झालेल्या धमाल गप्पा गोष्टींचा हा व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे...
शिंदेंच्या मित्रासाठी हा क्षण अविस्मरणीय ठरलाय...सयाजी शिंदेंनी हा व्हिडीओ आपल्या युट्यूब चॅनलवर पोस्ट केलाय.. सयाजी शिंदेंनी याप्रसंगाची मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखे असतात, असं म्हटलंय... हा व्हीडिओ जसजसा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आहे, तसंतसं नेटकऱ्यांकडून सयाजी शिंदेंवर कौतुकाचा वर्षावर होताय, खऱ्या अर्थानं 'हिरो', मैत्रीचं सुंदर उदाहरण, माणुसकी अजूनही जिंवत असल्याचं नेटकरी म्हणतायेत...पण आकाशाला गवसणी घालूनही कलाकार किती संवेदनशील असतो, मातीशी, आपल्या लोकांशी त्याची किती नाळ घट्ट आहे आणि दिलदारपणा कसा असावा हे सांगणारं उत्तम उदाहरण म्हणजे सयाजी शिंदे म्हटलं तर वावगं ठरणार नाही...!
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
























