Sudhakar Badgujar Nashik: बडगुजर-सलीम कुत्ताच्या फोटोवरुन रान उठवलं, आता भाजप प्रवेशावर नितेश राणे म्हणतात, येत असतील तर हरकत नाही!
Nitesh Rane on Sudhakar Badgujar: बडगुजर-सलीम कुत्ता प्रकरणी एसआयटी नेमायला भाग पाडली, पण सुधाकरभाऊंचा भाजप प्रवेश निश्चित होताच नितेश राणे म्हणाले...

Sudhakar Badgujar and Nitesh Rane: ठाकरे गटाचे नाशिकमधील माजी सामर्थ्यशाली नेते सुधाकर बडगुजर हे मंगळवारी दुपारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबत काहीसा संभ्रम असला तरी सुधाकर बडगुजर आणि त्यांचे कार्यकर्ते आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्यावर ठाम आहेत. सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) हे ठाकरे गटात असताना भाजपकडून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. सुधाकर बडगुजर आणि अंडरवर्ल्ड डॉन सलीम कुत्ता (Salim Kutta) यांचा एका पार्टीतील एकत्र डान्स करतानाचे फोटो समोर आले होते. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यावेळी विधानसभेत हे फोटो दाखवत सभागृह डोक्यावर घेतले होते. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जाईल, अशी घोषणाही केली होती. मात्र, आता सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होताच भाजप नेत्यांची भाषा 180 अंशांच्या कोनात बदलेली दिसत आहे. आक्रमक शैलीत विरोधकांचे लचके तोडणाऱ्या नितेश राणे यांनीही सुधाकर बडगुजर यांच्या भाजपमधील प्रवेशाचे स्वागत केले आहे. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हिंदुत्त्वाचा धागा घेऊन आमच्यासोबत कोणीही येत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करणार. बडगुजर आता 100 टक्के भगवाधारी झाले आहेत. त्यामुळे ते आमच्यासोबत येणार असतील त्यांचे स्वागतच आहे. बडगुजर यांचा हिंदुत्वाच्या दिशेने जोरदार प्रवास सुरु आहे. त्यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी आम्ही काढलेल्या सकल हिंदुत्व मोर्चात आघाडीवर होता. त्यामुळे आता ते येत असतील तर हरकत नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले.
सलीम कुत्ताच्या पार्टीतला बडगुजरसारख्या पापी जिवातम्यांचा हैदोस बघून भाचा नितेश राणेचे पित्त खवळले होते.
— SushmaTai Andhare (@andharesushama) June 17, 2025
यावर 52कुळी उपाय म्हणून तत्परता दाखवत "सुधाकर"ला सुधारक ठरवण्याचा विडा हाती घेतला.
बोले तो भिडू, यही BJPका हिंदुराष्ट्र है
कल को सलीम कुत्ता भी आकर मॅटर क्लोज कर सकता है.. pic.twitter.com/hUBiQqFEzI
Sudhakar Badgujar: सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत मुंबईत रात्री मोठ्या घडामोडी
काल रात्री उशीरा झालेल्या पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, या घडामोडींची कल्पना कोणीही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आली नव्हती. परिणामी मंगळवारी सकाळी बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत भाजपमधील सावळागोंधळ चव्हाट्यावर आला होता. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अनभिज्ञ असल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आणखी वाचा
बावनकुळेंनी भाजप पक्षप्रवेशाबाबत हात झटकले, बडगुजर म्हणाले, 'मुंबईत गेल्यावर तुम्हाला समजेल!'
























