एक्स्प्लोर

'डॉक्टर असे कधीच नव्हते,अत्यंत चुकीच्या गोष्टी दाखवल्यात', 'डॉक्टर काशिनाथ घाणेकर' सिनेमावर ज्येष्ठ अभिनेत्रीने व्यक्त केली तीव्र नाराजी

Savita Malpekar on Dr. Kashinath Ghanekar Movie : काही वर्षांपूर्वी आलेल्या आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर या सिनेमावर ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Savita Malpekar on Dr. Kashinath Ghanekar Movie : सुबोध भावे (Subodh Bhave) मुख्य भूमिकेत असलेला आणि अभिजीत देशपांडे दिग्दर्शित 'आणि काशिनाथ घाणेकर' (Ani Kashinath Ghanekar) ही सिनेमा 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात रंगभूमीवरचे दिग्गज कलाकार काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास उलगडला होता. पण या सिनेमात ज्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत, त्या अत्यंत चुकीच्या असल्यचा आरोप ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये  केलाय. 

सविता मालपेकर यांनी अनेक नाटकांमधून डॉक्टरांसोबत काम केलं आहे. त्यामुळेच ज्या गोष्टी सिनेमात दाखवल्या आहेत, तसा वैयक्तिक अनुभव मल कधीच आला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आशालता यांनीही अगदी रडत येऊन हा सिनेमा आपण पाहायचा नाही असं मला ठणकावून सांगितल्याचंही त्यांनी म्हटलं. पण परीक्षकाच्या भूमिकेत त्यांना हा सिनेमा पाहावा लागला. त्याचवेळी सिनेमात दाखवलेल्या गोष्टी चुकीच्या असल्याचं त्यांनी दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांन सांगितलं होतं. 

'हे अजिबात आवडलं नाहीये, फार चुकीचं दाखवलंय'

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं की, 'आज आशालता नाहीये आणि आशालताने डॉक्टरांसोबत खूप काम केलंय. जवळपास 1500 प्रयोग तिने केले आहेत. ती माझ्याजवळ आली आणि रडली म्हणाली सविता आपण डॉ.काशिनाथ घाणेकर सिनेमा बघायचा नाही. तू गेलीस बघायला तर बघ.. म्हटलं का काय झालं? ती म्हणाली डॉक्टर असे होते का? सिनेमात पहिलंच वाक्य असं बोललं गेलंय जे अत्यंत चुकीचं आहे. डॉक्टर काशिनाथ घाणेकर ही रंगभूमीला लागलेली किड आहे, असं वाक्य आहे त्या सिनेमात. 
 
पुढे त्यांनी म्हटलं की,  मला तो सिनेमा पाहायचा नव्हता. पण मी एका ठिकाणी परीक्षण होते म्हणून मला तो बघायला लागला. तेव्हा मी अभिजीत देशपांडेंना म्हटलंही, हे अजिबात आवडलं नाहीये, फार चुकीचं तुम्ही दाखवलंय. पहिली गोष्ट तर त्यावेळी रस्त्यावर बसून कोणी दारु प्यायचे नाहीत. डॉक्टर शौकिन होते, पण ते त्यांच्याच ऑरोमध्ये असायचे. मी जितकं काम केलं आहे त्यांच्यासोबत, मी जितकं त्यांना ओळखते मला कधीच तो अनुभव आला नाही.         

ही बातमी वाचा : 

Anshuman Vichare Birthday: दगडाचं कामही भीक मागून मिळवलं, 'फु बाई फू'नं दिली ओळख, अंशुमन विचारेनं विनोदी विश्वात 'असं' टाकलं पाऊल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 7 AM :13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget