एक्स्प्लोर

Abhijit Bichukale : अभिजित बिचुकले निवडणुकीच्या मैदानात, दोन रुपयांची दारू-मटण देऊन...

Abhijit Bichukale : सातारा लोकसभा मतदारसंघातून बिचुकले आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अभिजित बिचुकलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला.

Abhijit Bichukale :  कवी मनाचे नेते अशी ओळख असलेले आणि बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून बिचुकले आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अभिजित बिचुकलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), भाजप (BJP) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही निशाणा साधला. 

अभिजित बिचुकले यांनी आपली उमेदवारीचा घोषणा करताना खासदार म्हणून निवडून आल्यावर कोणती कामे करणार हे स्पष्ट केले. 2004, 2009, 2014, 2019 च्या निवडणुकीत मला चांगला पाठिंबा दिला. आता देखील मी निवडणूक अर्ज दाखल केला असून मतदारराजा जागृत झाला पाहिजे असे अभिजित बिचुकलेंनी म्हटले. दोन रुपयाची दारू पाजून,  मटण देऊन शक्ती प्रदर्शन केलं जात नाही असा टोलाही बिचकुलेंनी प्रस्थापित राजकारण्यांना लावला. 

अभिजित बिचुकले हे येत्या 19 एप्रिल रोजी सातारा लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उदयनराजेंना उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे  असे  सल्लाही बिचुकलेंनी दिला. या लोकसभा निवडणुकीत मला निवडून दिले तर मी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारक  पाठपुरावा करणार असल्याचे सांगत बिचुकलेने रणशिंग फुंकले.  मतदार राजा जागृत आहे आणि येत्या 19 एप्रिलला अर्ज भरणार असल्याची घोषणा बिचुकलेंनी केली.

उदयनराजेंची इच्छा पूर्ण पण... 

अभिजित बिचुकलेंनी साताऱ्यातील भाजपचे लोकसभा उमेदवार उदयनराजेंवर टीका केली. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची उदयन दादांची इच्छा होती, ती पूर्ण झाली. पण भाजपने छत्रपतींना किती सन्मान दिला याचे आत्मपरीक्षण उदयनराजेंनी आणि लोकांनी पण करावे असे आवाहन बिचुकलेंनी केले. 

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव संसद भवनला द्या ही मागणी मी केली होती. समुद्रातील छत्रपतींच्या स्मारक होण्याबाबत पाठपुरावा करणार आहे. पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले.पण, स्मारकाची एक विटही रचली नसल्याची टीका बिचुकलेंनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारस म्हणून माझ्या पाठिशी उभे राहा असे आवाहन बिचुकलेंनी केले. 

उदयनराजे आणि शरद पवारांचे हार्डवैर...

शरद पवार आणि उदयनराजे यांचे हाडवैर आहे. अभयसिंह महाराज यांचेही खच्चीकरण शरद पवार यांनी केले. योग्य वेळ की त्यांच्यावर बोलणार असल्याचे अभिजित बिचुकले यांनी म्हटले. मी या लढाईत एकटा लढत असून लोकांनी पाठिशी उभे राहण्याचे आवाहन बिचुकले यांनी केले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahmednagar News: मोठी बातमी: नगर जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती, जनावरांना दीड महिना पुरेल एवढाच चारा शिल्लक, शेतकरी टेन्शनमध्ये
मोठी बातमी: नगर जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती, जनावरांना दीड महिना पुरेल एवढाच चारा शिल्लक, शेतकरी टेन्शनमध्ये
Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या रायचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मधील लूक समोर; हात मोडला पण जलवा दाखवलाच
ऐश्वर्या रायचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मधील लूक समोर; हात मोडला पण जलवा दाखवलाच
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं धूमशान! पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट, मुंबई, ठाण्यातही बरसणार
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं धूमशान! पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट, मुंबई, ठाण्यातही बरसणार
Karale Master Full Speech Manmad : 4 तारखेला अजित पवारांचं घड्याळ 10 वाजून 10 मिनीटांनी बंद पाडा
4 तारखेला अजित पवारांचं घड्याळ बंद पाडा, कराळे मास्तरांनी खळखळून हसवलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, कशी, कुणामुळे? आरोपीला तीन दिवसानंतर अटकMarathwada Water Issue : दुष्काळाच्या झळा! मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 10 टक्के पाणीसाठी शिल्लकTOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 17 मे 2024 : ABP MajhaPrakash Ambedkar Tondi Pariksha : मोठा आरोप, राऊत-ठाकरेंची कोंडी! प्रकाश आंबेडकरांकडून गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahmednagar News: मोठी बातमी: नगर जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती, जनावरांना दीड महिना पुरेल एवढाच चारा शिल्लक, शेतकरी टेन्शनमध्ये
मोठी बातमी: नगर जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती, जनावरांना दीड महिना पुरेल एवढाच चारा शिल्लक, शेतकरी टेन्शनमध्ये
Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या रायचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मधील लूक समोर; हात मोडला पण जलवा दाखवलाच
ऐश्वर्या रायचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मधील लूक समोर; हात मोडला पण जलवा दाखवलाच
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं धूमशान! पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट, मुंबई, ठाण्यातही बरसणार
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं धूमशान! पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट, मुंबई, ठाण्यातही बरसणार
Karale Master Full Speech Manmad : 4 तारखेला अजित पवारांचं घड्याळ 10 वाजून 10 मिनीटांनी बंद पाडा
4 तारखेला अजित पवारांचं घड्याळ बंद पाडा, कराळे मास्तरांनी खळखळून हसवलं
PM Modi: ईडीने भ्रष्टाचाऱ्यांकडून जप्त केलेले पैसे गरिबांना परत करण्याचा केंद्र सरकारचा विचार: पंतप्रधान मोदी
ईडीने भ्रष्टाचाऱ्यांकडून जप्त केलेले पैसे गरिबांना परत करण्याचा केंद्र सरकारचा विचार: पंतप्रधान मोदी
बोरीवली कोकण रेल्वेला जोडण्याच्या कामाला मंजुरी, हार्बर रेल्वे बोरीवलीपर्यंत येणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
बोरीवली कोकण रेल्वेला जोडण्याच्या कामाला मंजुरी, हार्बर रेल्वे बोरीवलीपर्यंत येणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
Horoscope Today 17 May 2024 : आजचा दिवस 'या' राशींसाठी खास; अचानक धनलाभ होणार, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा दिवस 'या' राशींसाठी खास; अचानक धनलाभ होणार, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने झालेले खून, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप
ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने झालेले खून, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप
Embed widget