Santosh Juvekar on Chhaava Movie: 'छावा' मध्ये दिसणार मराठमोळ अभिनेता; शुटिंगदरम्यान, विक्की कौशलशी जमलेली गट्टी, आठवणी सांगताना म्हणाला...
Santosh Juvekar on Chhaava Movie: सुव्रत जोशीसोबतच आणखी एक मराठमोळा अभिनेता 'छावा' मध्ये दिसणार आहे. मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर या सिनेमात रायाजी ही भूमिका साकारणार आहे.

Santosh Juvekar on Chhaava Movie: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava Movie) चित्रपटाची चर्चा सध्या सगळीकडे आहे. या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) यशोगाथा रुपेरी पडद्यावर मांडली जाणार आहे. 'छावा' मध्ये अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. याव्यतिरिक्त मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकारही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेता सुव्रत जोशीनं (Suvrat Joshi) पोस्ट करून 'छावा' मध्ये दिसणं हे भाग्य असल्याचं म्हटलं होतं. अशातच सुव्रत जोशीसोबतच आणखी एक मराठमोळा अभिनेता 'छावा' मध्ये दिसणार आहे. मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर या सिनेमात रायाजी ही भूमिका साकारणार आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेता संतोष जुवेकरनं (Santosh Juvekar) 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली होती. यामध्ये त्यानं 'छावा' मधली रायाजीची भूमिका कशी मिळाली याबाबत सांगितलं आहे. त्यासोबतच त्यानं शुटिंग दरम्यानचे अनेक अनुभव सांगितले आहेत. याशिवाय संतोष जुवेकर आणि विक्की कौशल यांचं सेटवरचं बॉण्डिंग याबाबतही संतोषनं काही किस्से सांगितले आहेत.
राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना संतोष जुवेकर म्हणाला की, "छावा'चं शुटिंग वाईला सुरू होतं. जवळपास 1 महिना 10 दिवसांचं शेड्यूल होतं आणि त्याच्यात दोन दिवस मला गॅप होता. मला शूटिंग नव्हतं, मला प्रोडक्शनचा फोन आला, सर तुम्ही आहात का? तुम्ही सेटवर येऊ शकता का? मी त्यांना म्हणालो, माझं आज काहीच शूटिंग नाहीये. तर ते समोरून म्हणाले, नाही… विकी सरांनी तुम्हाला बोलावलं आहे."
View this post on Instagram
संतोष जुवेकर पुढे बोलताना म्हणाला की, "मी सेटवर गेलो लक्ष्मण सरांना विचारलं, त्यावेळी ते म्हणाले, त्या विकीला करमत नाहीये तुझ्याशिवाय त्यामुळे तो म्हणाला बोलवून घ्या. मी लगेच विक्कीकडे गेलो, विकी लगेच म्हणाला, आता मजा येणार. एकदा विक्कीचा हेल्पर आला, आम्ही जेवत बसलेलो, तो म्हणाला तुम्ही जेवला नाहीत ना? थांबा जेवू नका, सरांनी जेवण आणलंय, त्या दिवशी सेटवर विकीनं सर्वांसाठी त्याच्या घरून जेवण मागवलेलं. आम्ही सगळे एकत्र जेवलो."
"सेटवर एकट्या विकीच्या तीन व्हॅनिटी असायच्या. फूड व्हॅनिटी, जिम व्हॅनिटी आणि त्याची एक व्हॅनिटी. त्याची जी फूड व्हॅनिटी होती, तिथे लिहिलं होतं की, 'स्पेशली क्रिएटेड फॉर मिस्टर विकी कौशल; त्यावेळी मी त्याला सहज म्हटलं, एक दिवस माझं नावही असंच लिहिलेलं असेल. तेव्हा विकी मला म्हणाला, "अरे... पक्का होगा…" त्याच्या वागण्यातून राहणीमानातून एक आपलेपणा जाणवतो. आज ज्या पातळीवर तो पोहोचला आहे, ते सगळं तो डिझर्व्ह करतो." असं संतोष जुवेकरने म्हणाला.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर तयार करण्यात आलेला 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील काही दृश्यांवरुन वाद निर्माण झाला होता. पण, दिग्दर्शकांनी ती दृश्य काढून टाकण्याची ग्वाही दिल्यामुळे आता हा वाद क्षमला आहे, असं म्हटलं तरी वावगलं ठरणार नाही. या चित्रपटात विक्की कौशलसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
पाहा ट्रेलर :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
