Sankarshan Karhade : लोकांनी भरलेलं सभागृह ,प्रयोगानंतर टाळ्यांचा कडकडाट..., कतारमध्ये मराठी नाटकाचा हाऊसफुल्ल प्रयोग;संकर्षणची खास पोस्ट
Sankarshan Karhade : अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता देशमुख यांच्या नियम व अटी लागू या नाटकाचा कतारमध्ये हाऊसफुल्ल प्रयोग झाला.
![Sankarshan Karhade : लोकांनी भरलेलं सभागृह ,प्रयोगानंतर टाळ्यांचा कडकडाट..., कतारमध्ये मराठी नाटकाचा हाऊसफुल्ल प्रयोग;संकर्षणची खास पोस्ट Sankarshan Karhade Social Media post after Marathi Play Niyam ani Ati Lagu Housefull in Katar Entertainment news in marathi Sankarshan Karhade : लोकांनी भरलेलं सभागृह ,प्रयोगानंतर टाळ्यांचा कडकडाट..., कतारमध्ये मराठी नाटकाचा हाऊसफुल्ल प्रयोग;संकर्षणची खास पोस्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/21/137b1795e058e3ffbbc558a3a07a59ad1726934343153720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sankarshan Karhade : मराठी रंगभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर येणार नाटकं यामुळे रसिक प्रेक्षक सध्या नाट्यगृहाकडे वळत असल्याचं चित्र आहे. मराठी नाट्यगृहांच्या बाहेरही सध्या हाऊसफुल्लचा बोर्ड झळकतो. असं असतानाच हाच हाऊसफुल्लचा बोर्ड आता सातासमुद्रापारही पोहचला आहे. अनेक मराठी नाटकांचे प्रयोग (Marathi Play) सध्या परदेशातही हाऊसफुल्लच्या बोर्डात पार पडत आहे.
नुकतच संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता देशमुख यांच्या नियम व अटी लागू या नाटकाचा कतारमध्ये प्रयोग संपन्न झाला. हा प्रयोग हाऊसफुल्ल झाला. त्यावर अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने एक खास पोस्ट केली आहे. सध्या सोशल मीडियावरही त्याच्या या पोस्टची बरीच चर्चा होतेय. यावर अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुकही केलं आहे. सध्या हे नाटकंही बरंच गाजत असून हल्लीच्या नवरा बायकोच्या आयुष्यावर भाष्य करणारं हे नाटक आहे.
संकर्षणची पोस्ट नेमकी काय?
नमस्कार, अहो “परभणीच्या काद्राबाद” एरियात रहायचो तेंव्हा कधिही वाटलं नव्हतं कि “कतार” मध्ये HOUSEFUL प्रयोग करायची संधी मिळेल ! जवळपास 800 लोकांनी भरलेलं ते सभागृह , प्रयोगानंतर टाळ्यांचा कडकडाट आणि पाणीपुरी च्या खमंग प्लेटनंतर सूकी पूरी मागावी तशी नाटकाच्या प्रयोगानंतर प्रेक्षकांनी केलेली कवितेची फर्माईश … माशा अल्लाह ! काय मज्जा आली !
पुढे संकर्षणने म्हटलं की, मराठी माणसांना , रसिक प्रेक्षकांना जगात तोड नाही … कतार मराठी मंजळाने केलेलं आऊटसॅडिंग, उत्तम नियोजन..येतांना एअर ईंडियाच्या विमानांत बसलो तर Cabin Crew इनचार्ज अनघा मॅडम होत्या … त्यांनी ओळखलं , विशेष काळजी घेतली , गिफ्टं दिलं …असा सगळा दौरा सुफल संपन्नं झाला.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)