कन्फर्म! समंथानं राज निदिमोरूनं गुपचूप उरकलं लग्नस; भरजरी साडीतले नवऱ्यासोबतचे PHOTO शेअर
Samantha Ruth Prabhu-Raj Nidimoru Wedding: समंथा रूथ प्रभूनं राज निदिमोरूशी लग्न केल्यानंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये राज समंथाच्या हातात अंगठी घालताना दिसतोय.

Samantha Ruth Prabhu-Raj Nidimoru Wedding: साऊथची सुपरस्टार अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिनं गपचूप दुसरं लग्न उरकलं आहे. समंथानं 'द फॅमिली मॅन'चे (The Family Man) निर्माते राज निदिमोरू (Raj Nidimoru) यांच्याशी तामिळनाडूतील कोइम्बतूर येथील सद्गुरूंच्या ईशा योग केंद्रात गुपचूप लग्न केलं आहे. समंथा आणि राज यांच्या लग्नसोहळ्यासाठी जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होते. तिनं सोशल मीडियावर फोटो शेअर केलेत. आपल्या लग्नासाठी समंथानं लाल रंगाची साडी वेअर केलेली.
समंथा रूथ प्रभूनं राज निदिमोरूशी लग्न केल्यानंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये राज समंथाच्या हातात अंगठी घालताना दिसतोय. समंथानं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "1-12-2025"
View this post on Instagram
सामंथा आणि राज यांच्या लग्नाचे फोटो
समंथानं लाल रंगाची साडी नेसलेली, तर राजनं पांढरा कुर्ता-पायजमा आणि बेज कलरचं जॅकेट वेअर केलेलं. एका फोटोमध्ये दोघे लग्नाचे विधी करताना दिसताय.
राज निदिमोरू कोण आहेत? (Who Is Raj Nidimoru?)
राज निदिमोरू यांना 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजमुळे लोकप्रियता मिळाली. त्यांनी कृष्णा दसरकोथापल्ली सोबत ही वेब सीरिज तयार केली. हे दोघे राज आणि डीकेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी 'फर्गी', 'सिटाडेल: हनी बनी' आणि 'गन्स एन रोझेस' सारखे चित्रपट देखील बनवलं आहेत. त्यांनी '99', 'शोर इन द सिटी', 'गो गोवा गॉन', 'हॅपी एंडिंग' आणि 'अ जेंटलमन'सारखं चित्रपट देखील दिग्दर्शित केले आहेत. त्यांनी 2018 ची 'स्त्री' देखील लिहिली.
दिग्दर्शक राज निदिमोरूच्या घटस्फोटीत पत्नीनं शेअर केलेली पोस्ट
रविवारपासूनच समंथा आणि राज निदिमोरू यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरलेला. राज आणि समंथा दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. राज यांची एक्स वाईफ Sshyamali De नं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केलेली. ज्यामध्ये लिहिलेलं की, "desperate people do desperate things..." या पोस्टनंतर समंथा आणि राज यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरलेला. 2022 मध्ये राज आणि Sshyamali नं घटस्फोट घेतलेला.
























