एक्स्प्लोर

Salman Khan : सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी; धमकी देणारा अल्पवयीन मुलगा मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात

Salman Khan : सलमान खानला धमकीचा कॉल करणाऱ्या अल्पवयीन मुलाला मुंबई गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे.

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला (Salman Khan) पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात सलमानला धमकीचा कॉल आला आहे. आता त्याला धमकी देणाऱ्या अल्पवयीन मुलाला मुंबई गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. दबंग खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर आता पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

सलमान खानला धमकी देणारा अल्पवयीन मुलगा 16 वर्षांचा आहे. त्याला ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानला धमकी देणारा मुलगा मुळचा राजस्थानचा असून त्याला शहापूर येथे त्याला त्याच्या भावासोबत पकडण्यात आलं आहे. या मुलाची प्रकृती स्थिर असून त्याने सलमानला फोन का केला याचा पोलीस तपास करत आहेत. 

नेमकं प्रकरण काय?

सलमान खान गेल्या काही दिवासांपासून धमकी प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता एका 16 वर्षीय मुलाने त्याला धमकीचा फोन केला आहे. त्याने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 30 एप्रिलला तो सलमान खानला मारणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. त्याने रॉकी भाई अशी स्वत:ची ओळख सांगितली असून तो मुळचा राजस्थानमधील जोधपूरचा रहिवासी आहे.  मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला सोमवारी रात्री 9 वा. हा धमकीचा फोन आला होता. याप्रकरणी पोलीस अधिक तसाप करत आहेत. 

सलमान खानला याआधी लॉरेन्स बिश्नोई गॅंगने धमकी दिली होती. त्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. स्वत:च्या संरक्षणासाठी त्याने परदेशातून बुलेटप्रुफ गाडीदेखील मागवली आहे. त्याला धमकीचा मेल आल्यानंतर त्याने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलिसांनी गॅंगस्टार गोल्डी ब्रार, लॉरेन्स बिश्नोई आणि रोहित गर्ग यांच्यावर गुन्हा दाखल केला. 

सलमान खान धमक्यांना घाबरणारा नाही

लॉरेन्स बिश्नोई धमकीप्रकरणानंतर सलमानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. याआधी धमक्यांबद्दल सलमान खान म्हणाला होता,"धमक्यांकडे जास्त लक्ष दिलं तर त्या धमकी देणाऱ्या व्यक्तीकडे जास्त लक्ष देत आहोत असं होईल, हे अत्यंच चुकीचं आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीला मी काही म्हणालो तर त्याच्या प्लॅनमध्ये तो अधिक यशस्वी होईल. मी धमक्यांना घाबरणारा नाही. जेव्हा जे व्हायचं तेव्हा ते होईल". 

संबंधित बातम्या

Salman Khan : धमकीनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाला, "जेव्हा जे व्हायचं असेल, तेव्हा ते होईलच"

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : महायुतीत खलबंत ते ठाकरेंची पालिकेसाठी रणनीती; झीरो अवरमध्ये सविस्तर विश्लेषणBharat Gogawale Zero Hour : पाऊण तास खलबतं...शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत काय ठरलं? गोगावले EXCLUSIVEZero Hour Ramakant Achrekar Memorial : आचरेकर सरांच्या स्मारकाचं राज - सचिन यांच्या हस्ते उद्घाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget