सुन्न नवविवाहिता लेफ्टनंट पतीच्या मृतदेहाजवळ, फोटो पाहून आख्खा देश हळहळला, सलमान खान म्हणाला, पुरी कायनात को....
Salman Khan on Pahalgam Terror Attack : सुन्न नवविवाहिता लेफ्टनंट पतीच्या मृतदेहाजवळ, फोटो पाहून आख्खा देश हळहळला, सलमान खान म्हणाला, पुरी कायनात को....

Salman Khan on Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मिरमधील पहलगाममध्ये येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झालाय. या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 नागरिकांना जीव गमावलाय. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, कालपासून लेफ्टनंटच्या पत्नीचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतंय. नुकतेच लग्न झालेलं असताना लेफ्टनंटने जीव गमावलाय. नवऱ्याचा गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर लेफ्टनंटची पत्नी त्याच्या मृतदेहाजवळ बसून होती. तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर संपूर्ण देश सु्न्न झालाय. दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता सलमान खान याने प्रतिक्रिया दिली आहे.
Kashmir,heaven on planet earth turning into hell. Innocent people being targeted, my heart goes out to their families . Ek bhi innocent ko marna puri kainath ko marne ke barabar hai
— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 23, 2025
अभिनेता सलमान खानने ट्विटरवर लिहिले की, काश्मीर, पृथ्वीवरील स्वर्गाचं रुपांतर नरकात झालं, निष्पाप नागरिकांना लक्ष्य केलं गेलं, त्यांच्या कुटुंबीयांसाठी मी मनापासून दु:खी आहे, एक भी मासूम को मारना पुरी कायनात को मारने के बराबर है...
शाहरुख खानने ट्विटरवर लिहिले की, पहलगाममध्ये घडलेल्या विश्वासघातकी आणि अमानवी हिंसक घटनेमुळे होणारं दु:ख आणि राग शब्दात व्यक्त करता येत नाही. अशा काळात, आपण केवळ देवाकडे त्या पीडित कुटुंबांसाठी प्रार्थना करू शकतो आणि आपल्या अंत:करणातून शोक व्यक्त करू शकतो. हे दु:खद प्रसंग झेलणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी माझ्या मनापासून संवेदना आहेत. एक राष्ट्र म्हणून आपण सर्वजण एकत्र, बळकट उभे राहू आणि या अमानवी कृत्याविरुद्ध न्याय मिळवू.
Words fail to express the sadness and anger at the treachery and inhumane act of violence that has occurred in Pahalgam. In times like these, one can only turn to God and say a prayer for the families that suffered and express my deepest condolences. May we as a Nation, stand…
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 23, 2025
महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू; संपूर्ण राज्यातून हळहळ
दरम्यान, काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जण मृत्युमुखी पडले आहेत. पुण्यातील दिलीप देसले यांचे पार्थिव आज त्यांच्या राहत्या घरी 5.30 वाजेपर्यंत नविन पनवेल येथे आणणार आहे. देसेले यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त लावला असून, देसले यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया देण्याची परिस्थती नाही. संपुर्ण परिसरात सध्या भावनिक वातावरण असुन स्मशान शांतता आहे. थोड्या वेळात देसले यांचे पार्थिव हे निवास्थानी येउन नंतर पोदी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता शाहरुख खानची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला...























