पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता शाहरुख खानची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला...
Shah Rukh Khan on Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता शाहरुख खानची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला...

Shah Rukh Khan on Pahalgam Terror Attack : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झालाय. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये पुणे, डोंबिवली आणि पनवेलमधील नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, संपूर्ण बॉलिवूड आणि मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
शाहरुख खानने ट्विटरवर लिहिले की, पहलगाममध्ये घडलेल्या विश्वासघातकी आणि अमानवी हिंसक घटनेमुळे होणारं दु:ख आणि राग शब्दात व्यक्त करता येत नाही. अशा काळात, आपण केवळ देवाकडे त्या पीडित कुटुंबांसाठी प्रार्थना करू शकतो आणि आपल्या अंत:करणातून शोक व्यक्त करू शकतो. हे दु:खद प्रसंग झेलणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी माझ्या मनापासून संवेदना आहेत. एक राष्ट्र म्हणून आपण सर्वजण एकत्र, बळकट उभे राहू आणि या अमानवी कृत्याविरुद्ध न्याय मिळवू.
Words fail to express the sadness and anger at the treachery and inhumane act of violence that has occurred in Pahalgam. In times like these, one can only turn to God and say a prayer for the families that suffered and express my deepest condolences. May we as a Nation, stand…
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 23, 2025
दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता सनी देओलची प्रतिक्रिया
सनी देओल म्हणाला, सध्या जगाने फक्त दहशतवाद संपवण्याचा विचार केला पाहिजे. दहशतवादाचे बळी फक्त निष्पाप लोक आहेत, मानवाने स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची गरज आहे. या दुःखाच्या वेळी मी पीडित कुटुंबांसोबत उभा आहे.
अभिनेता अक्षय कुमार म्हणाला, पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी ऐकून खूप वाईट वाटले. निष्पाप लोकांना अशा प्रकारे मारणे हे निंदनीय आहे. त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना. 🙏
अभिनेत्री रवीना टंडन म्हणाली, ओम शांती. 🙏🏻🕉️🙏🏻 धक्का बसला आणि संतापले. दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. पीडितांसाठी प्रार्थना आणि शक्ती. आपण सर्वांनी मिळून घरातील किरकोळ भांडणे सोडून, एकत्र येऊन खऱ्या शत्रूला ओळखण्याची वेळ आली आहे.
Om Shanti. 🙏🏻🕉️🙏🏻 condolences.
— Raveena Tandon (@TandonRaveena) April 22, 2025
Shocked and angry . No words to express the anguish. Prayers and strength to the victims . Time we all let go of petty in-house fighting , UNITE and realise the true enemy. https://t.co/zSUIGHo1QP
इतर महत्त्वाच्या बातम्या
VIDEO : हलगीच्या ठेक्यावर अंग कापतंया थरथर, सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक'मधील नव्या गाण्याची चर्चा
























