![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bharti Singh,Salman Khan : भारती सिंहच्या मुलाला सलमान करणार बॉलिवूडमध्ये लाँच? बिग बॉसमध्ये केलं होतं प्रॉमिस
सध्या सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसत आहे.
![Bharti Singh,Salman Khan : भारती सिंहच्या मुलाला सलमान करणार बॉलिवूडमध्ये लाँच? बिग बॉसमध्ये केलं होतं प्रॉमिस salman khan bharti singh bollywood news salman Promising to launch bharti baby boy video gos viral Bharti Singh,Salman Khan : भारती सिंहच्या मुलाला सलमान करणार बॉलिवूडमध्ये लाँच? बिग बॉसमध्ये केलं होतं प्रॉमिस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/05/79d57f9bd1e45a82892975a7855fee09_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bharti Singh,Salman Khan : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa)यांच्या घरी काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्याचं आगमन झालं. भारतीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ती आई झाल्याची बातमी तिच्या चाहत्यांना दिली होती. तिनं, इट् अ बॉय अशी पोस्ट शेअर तेली होती. अनेक सेलिब्रिटींनी हर्ष आणि भारतीला शुभेच्छा दिल्या. सध्या सलमान खान (Salman Khan) चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान भारतीला प्रॉमिस करताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सलमान, भारती आणि हर्ष हे बिग बॉस-15 च्या सेटवर दिसत आहे. बिग बॉस -15 मध्ये हर्ष आणि भारती हे हुनरबाज या त्यांच्या कार्यक्रमाचे प्रमोशन करण्यासाठी आले होते. तेव्हा भारतीनं सलमानला तिच्या होणाऱ्या मुलाला बॉलिवूडमध्ये लाँच करण्याची विनंती केली होती.
View this post on Instagram
भारती म्हणाली होती की, 'करण जोहरनं तिच्या मुलाला लाँच करायला नकार दिला. तर तु माझ्या मुलाला लाँच करशील का?' भारतीच्या या प्रश्नाला सलमाननं उत्तर दिलं. तो म्हणाला, 'नक्कीच मी तुझ्या मुलाला बॉलिवूडमध्ये लाँच करेल. ' आता सलमाननं भारतीला दिलेलं प्रोमीस तो पूर्ण करेल का? याची वाट प्रेक्षक पाहात आहेत.
संबंधित बातम्या
- Sri lanka Curfew : श्रीलंकेत 36 तासांचा कर्फ्यू हटवला, नवीन मंत्रिमंडळ स्थापन होणार, पंतप्रधान करणार संबोधित
- ...तर आपलीही अवस्था श्रीलंकेसारखी होईल, पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त
- आणीबाणी जाहीर केल्यानंतर श्रीलंकेत निदर्शने, कर्फ्यूचे उल्लंघन केल्याप्रकरणी 600 पेक्षा जास्त जणांना अटक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)