एक्स्प्लोर

सलीम खान यांची प्रकृती नाजूक, तब्येतीबाबत डॉक्टरांची पहिली प्रतिक्रिया; मेडिकल बुलेटीन देणार

Veteran Bollywood writer Salim Khan has been admitted to the ICU: सलमान खान यांचे वडील सलीम खान यांना सकाळी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Salim Khan admitted to ICU at Lilavati Hospital Mumbai: भारतीय सिनेसृष्टीतील अजरामर लेखक  सलीम खान यांची प्रकृती अत्यंत बिकट झाली आहे.  त्यांना सकाळी तातडीने वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  सलीम खान यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती आहे.  त्यांच्यावर नेमकं कोणत्या आजारावर उपचार सुरु आहेत? त्यांची प्रकृती  नेमकी कोणत्या कारणामुळे खालावली?  याची माहिती समोर अद्याप समोर आलेली नाही.  सकाळी अभिनेता सलमान खान तातडीने वडिलांची भेट घेण्यासाठी  रुग्णालयात पोहोचला होता. तो सकाळी रुग्णालयाबाहेर स्पॉट झाला होता.  नंतर खान कुटुंबातील सर्वांनी रुग्णालयात जाऊन सलीम खान यांची भेट घेतली.

दरम्यान, सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयातील डॉक्टरांनी माहिती दिली. सलीम खान यांचे डॉक्टर जलील पारकर यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटलं की,  'सलीम खान यांना सकाळी 8:30 वाजता डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखेखाली लीलावती रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांचे फॅमिली डॉक्टर संदीप चोपडा यांनी त्यांना इमरजेंसीमध्ये आणले. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु झाले.  डॉ. सलीम खान यांना पहिल्या मजल्यावर अतिदक्षता विभागात हलविण्यात आले.   डॉ. विनय चव्हाण, डॉ. अजीत मेनन, डॉ. नितिन डांगे, डॉ. बिनीत अहलूवालिया या डॉक्टरांच्या टीमकडून उपचार सुरु आहेत.  

कुटुंबांच्या विनंतीचा आदर करून, आज कोणतीही अधिक माहिती शेअर केली जात नाही. उद्या सकाळी 11  वाजता, आम्ही कुटुंबाच्या समंतीने  आणि रुग्णाची संपूर्ण गोपनीयता राखून एक प्रेस बुलेटिन जारी करु.. ते सध्या स्थिर आहेत.  त्यांच्या क्लिनिकल स्टेटसचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे', असं त्यात नमूद करण्यात आले आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Filmymantra Media (@filmymantramedia)

सलीम खान यांच्यावर मुंबईतील लीलावती  रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना रुग्णालयात भर्ती करताच खान कुटुंबाने तातडीने रुग्णालयात धाव घेतली. सलीम खान यांची पहिली आणि दुसरी पत्नी, सलमा खान आणि हेलन यांनी रुग्णालयात धाव घेतली. दोघींनीही सलीम खान यांची भेट घेतली.  तसेच बॉलिवूडमधील इतर कलाकारांनीही लेखक सलीम खान यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसेच त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget