एक्स्प्लोर

सैराटनंतर खूप पैसे आले, अभिनेत्याची मोठी आर्थिक फसवणूक, जवळच्याच मित्रांनी पैसे उकळले अन् ...

अचानक मिळालेल्या एवढ्या पैशाचं काय करायचं हे न कळल्यामुळे अनेकांनी फसवणूक केल्याची खंतही त्याने व्यक्त केली.

Tanaji galangude: नागराज मंजुळेंच्या सैराट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील सर्व गाण्यांसह आर्ची - परश्या - लंगड्या अशा सगळ्याच भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या होत्या. या चित्रपटात परश्याच्या मित्राची भूमिका साकारणारा अभिनेता तान्हाजी गालगुंडे घराघरात लोकप्रीय झाला. सैराटमध्ये काम केल्यानंतर त्याला अनेक सिनेमे मिळू लागले. पैसा मिळू लागला . मात्र, त्या काळात अनेकांनी त्याला आर्थिक बाबतीत फसवल्याचं त्याने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे. अचानक मिळालेल्या एवढ्या पैशाचं काय करायचं हे न कळल्यामुळे अनेकांनी फसवणूक केल्याची खंतही त्याने व्यक्त केली.

सैराट चित्रपटानंतर अभिनेता तानाजी गालंगुडे याचे 22 चित्रपट झाले. त्यातील 18 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. 

काय म्हणाला तान्हाजी गालंगुडे ? 

सकाळच्या एका पॉडकास्टमध्ये बोलताना तान्हाजी गालंगुडे म्हणाला," सैराट झाल्यानंतर माझ्याकडे चांगले पैसे यायला लागले होते. चांगले सिनेमेही मी केले. पैसे मिळायला लागले. पण त्या काळात माहीत नव्हतं की एवढ्या पैशांचं करायचं काय. आपलं पैशाबाबतीत फार अज्ञान असतं. गावाकडल्या लोकांना खरंच काही माहीत नसतं. याच काळात असे काही मित्र आले. ते म्हणाले आपण काहीतरी व्यवसाय करू. मग तू मला एवढे पैसे दे. काही जण म्हणाले एवढे पैसे दे तुला एवढे करून देतो. असे काही मित्र आले की मला पैशाची गरज आहे. तू मला दे मग तुला परत देतो. यामध्ये मग अशी वेळ आली की मी माझ्याजवळ काहीच पैसे ठेवले नाहीत. मी हात वर करून सगळे पैसे देऊन टाकले. पण, ती माणसं फक्त पैशासाठी आली होती. त्यांचा इतर दुसरा काहीच उद्देश नव्हता".

पैसे घेऊन गायब झाले...

पैसे घेतल्यानंतर हे सगळेजण गायब झाले. याचा मला प्रचंड मानसिक त्रासही झाला. ते नंतर माझे फोनही उचलत नव्हते. काहींनी मला ब्लॉक केलेलं. मी त्यांना मित्र म्हणून खूप जवळचं मानलं होतं. पण मी त्यातून एक गोष्ट शिकलो की तुला लाँग टर्म रिलेशन टिकवायचंय तर तू त्यांच्याशी व्यवहार नाही केला पाहिजे. व्यवहार जरी केला तरी तो एवढाच केला पाहिजे की त्या पैशाचा तुला फरक पडता कामा नये. म्हणजे तुझ्याकडे जर 10 लाख रुपये आहेत. तर तू 5 हजार रुपयांचाच व्यवहार एखाद्यासोबत केला पाहिजे. 10 लाखातले 5 हजार गेले तरी तुला फरक पडणार नाही. पण 10 लाख देऊन टाकले तर आपल्यासारखी माणसं संपूनच जातात. कारण एवढे पैसे कमावणं खूप अवघड आहे" असं तान्हाजी म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget