Jersey Movie : 'जर्सी'ची स्क्रिप्ट वाचल्यानंतर शाहिदला अश्रू अनावर; भावूक करणारा अनुभव
Jersey Movie : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करतो. शाहिदच्या कबीर सिंह या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
Jersey Movie Trailer Launch : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करतो. शाहिदच्या कबीर सिंह या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटातील शाहिदच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधले होते. नुकताच शाहिदच्या 'जर्सी' (Jersey) या आगामी चित्रपटचा ट्रेलर मुंबईमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 31 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर लाँचच्या वेळी शाहिदने या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचताना त्याला कसा अनुभव आला त्याबद्दल सांगितले.
शाहिदने सांगितले, 'कबीर सिंह हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन आठवड्याने मला जर्जी या चित्रपटाची ऑफर आली होती. त्यावेळी मी स्क्रिप्ट वाचली. स्क्रिप्ट वाचताना माझी पत्नी मीरा आणि माझा मॅनेजर माझ्यासोबत बसले होते. जर्सी चित्रपटाचे कथानक माझ्या ह्रदयाला भिडले. त्यामुळे मी या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचताना भावूक झालो होतो.'
View this post on Instagram
शाहिद कपूरने सिनेमाचे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे,"हा सिनेमा खूप जवळचा आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी दोन वर्षे वाट पाहिली आहे. हा सिनेमा लाखो प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करण्यात यशस्वी ठरणार आहे. या सिनेमाची दोन वर्ष वाट पाहिली आहे. या सिनेमाची कथा खास आहे. या सिनेमाची टीम खास आहे, या सिनेमातील पात्र खास आहे. आम्ही ते मोठ्या पडद्यावर आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहोत ही वस्तुस्थिती आहे. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत".
जर्सी चित्रपटात शाहिदसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर प्रमुख भूमिका साकारणार आहे. गौतम तिन्ननुरी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. शाहिदच्या पद्मावत, उडता पंजाब, हैदर , पोस्टर निकला हीरो, आर.. राजकुमार आणि जब वी मेट या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. सध्या जर्सी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Rubina Dilaik: बॉडी शेमिंग करणाऱ्या ट्रोलर्सना Rubina Dilaik चे सडेतोड उत्तर; पोस्ट चर्चेत