सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी अपडेट! पोलिसांच्या हाती मोठा पुरावा; आरोपीच्या मुसक्या कधी आवळणार?
Saif Ali Khan Attacked: सैफ अली खान हल्ला प्रकरणात लिलावती रुग्णालयातून ब्लेडचा तुकडा पुरावा म्हणून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
Saif Ali Khan Attacked: सैफ अली खान (Saif Ali Khan) हल्ला प्रकरणात पोलिसांनी वेगानं तपासाची सूत्र फिरवण्यास सुरुवात केली आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील (Saif Ali Khan Attacked Case) हैराण करणारी बाब म्हणजे, सैफच्या घरात घुसलेला चोर सीसीटीव्हीमध्ये दिसला. पण अजूनही पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. त्याचबरोबर पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी 20 पथकं तयार केली आहेत आणि त्या सर्वांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी ही पथके विविध ठिकाणी छापे टाकत आहेत. अशातच आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणातला सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लिलावती रुग्णालयातून (Lilavati Hospital) पोलिसांनी सैफ अली खानच्या पाठीतून काढण्यात आलेला ब्लेडचा तुकडा पुरावा म्हणून ताब्यात घेतला आहे. हा या प्रकरणातला सर्वात मोठा पुरावा असल्याचं सांगितलं जात आहे. सैफ अली खानवर गुरुवारी त्याच्या राहत्या घरात चाकू हल्ला झाला. त्यानंतर सैफ अली खानला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफला गंभीररित्या जखमी झाला होता. त्याच्या पाठीच्या मणक्यावर तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सैफ अली खानला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं.
सैफची प्रकृती उत्तम, धोका टळला
सैफची प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे. त्याची प्रकृती आता उत्तम असून त्याला कोणताही धोका नसल्याची माहिती दिली आहे. तसेच, आता तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्यानंतर सैफला अतिदक्षता विभागातून बाहेर ठेवण्याबाबत कुटुंबियांशी सल्लामसलत करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
सैफच्या पाठीतून अडीच इंची ब्लेडचा तुकडा काढला
सैफ अली खानच्या घरातच्या झालेल्या चाकूहल्ल्यानंतर तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला तात्काळ वांद्रे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्यावेळी अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यावेळी तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या. रक्तबंबाळ अवस्थेतच सैफ अली खान रुग्णालयात पोहोचला. त्यानंतर त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या पाठीत धारधार शस्त्राचा तुकडा खुपसण्यात आला होता. तो तातडीनं शस्त्रक्रिया करुन काढावा लागला. चाकू डिपमध्ये गेल्याने मज्जातंतूच्या जवळपास इजा झाली होती. पाठितील जे पाणी असतं, ते लीक होतं होतं. तिथं डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :