एक्स्प्लोर

Saif Ali Khan Attack Case : सैफ खरंच जखमी, रक्तबंबाळ होता की, फक्त अ‍ॅक्टिंग...? रुग्णालयापर्यंत नेणाऱ्या रिक्षा ड्रायव्हरनं सांगितलं हादरवणारं सत्य

Saif Ali Khan Attack Case : मुंबईतील वांद्रे इथे सैफ अली खान याच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे आणि शिवसेना नेते संजय निरुपम यांनी अभिनेत्यावर झालेल्या हल्ल्यावर प्रश्न उपस्थित केले होते. आता ऑटो रिक्षाचालकानं याबाबत खुलासा केला आहे.

Saif Ali Khan Attack Case : सैफ अली खानवर (Saif Ali Khan) मुंबईतील (Mumbai) वांद्रे (Bandra) येथील राहात्या घरात घुसून चोरट्यानं जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यानंतर सैफ अली खानवर तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खानच्या पाठीत मणक्याजवळ रुतलेला चाकूचा अडीच इंचाचा तुकडा काढण्यात आला. त्यानंतर पाच दिवसांच्या औषधोपचारानंतर सैफ अली खान घरी परतला. पण, मणक्याजवळ चाकूच्या तुकड्यामुळे झालेल्या दुखापतीनंतरही सैफ अगदी ठिकाठाक स्वतःच्या पायांवर चालत आपल्या घरी परतला. नेमकं हेच अनेकांना पटलं नाही. एवढ्या गंभीर दुखापतीनंतर सैफ अली खान अगदी व्यवस्थित चालत कसा आला? एवढ्या लवकर त्याची रिकव्हरी कशी? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. आता यासंदर्भातच सैफला जखमी अवस्थेत लीलावती रुग्णालयापर्यंत सोडणाऱ्या रिक्षाचालकानं माहिती दिली आहे. 

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरी झालेल्या हल्ल्यानंतर, महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) आणि शिवसेना (Siv Sena Shinde Group) नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी अभिनेत्याच्या दुखापतींच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर, अभिनेत्याला रुग्णालयात घेऊन जाणारा ऑटो रिक्षा चालक भजन सिंह राणा यानं आयएएनशी बातचित करताना अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. त्यानं सांगितलं की, हल्ला झाला त्यावेळी सैफला खरंच गंभीर दुखापत झाली होती, तो नाटक करत नव्हता. संजय निरुपम यांनी प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली होती आणि सैफच्या प्रकृतीबद्दल शंका उपस्थित केली होती. संजय निरुपम यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं की, " पाठीत चाकू रुतणं आणि सर्जरीनंतर लगेचच अभिनेता इतका तंदुरुस्त असणं, आश्चर्यकारक नाही का?" मंत्री नितेश राणे यांनीही सैफच्या दुखापतींबद्दल शंका व्यक्त केली होती.

आयएएनशी बोलताना हल्ल्यानंतर जखमी सैफला लीलावती रुग्णालयात पोहोचवणाऱ्या ऑटो रिक्षा चालक भजन सिंह राणा (Auto Driver Bhajan Singh Rana) यानं सांगितलं की, "जेव्हा मी पहिल्यांदा सैफ अली खानला पाहिले तेव्हा त्याचा कुर्ता रक्तानं माखलेला होता आणि त्यांच्या शरीरातून रक्त वाहत होतं." पुढे भजन सिंह यांना विचारण्यात आलं की, तुम्ही ज्या स्थितीत सैफला पाहिलं , त्या स्थितीत तो पाच दिवसांत इतका तंदुरुस्त कसा होऊ शकतो का? यावर ते म्हणाले की, "लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर चांगले आहेत आणि उत्तम सर्जन आहेत. ते या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा किंवा इतर कोणापेक्षाही चांगलं देऊ शकतात. या मुद्द्यावर राजकारण नसावं, कारण ते अॅक्टिंग करत नव्हते."

सैफ रक्तबंबाळ होता, पाहून मीच हादरलेलो : रिक्षाचालक भजन सिंह राणा

ऑटो रिक्षाचालक भजन सिंह राणा म्हणाला की, "हल्ला झाला त्या रात्री सैफला नेताना रिक्षामध्ये तिघेजण होते. सैफसोबत एक लहान मुलगा होता आणि आणखी एक व्यक्ती होती. ज्यावेळी मी त्यांना पाहिलं, त्यावेळी मला अजिबात वाटलं नाही की, सैफ अली खान नाटक करत आहे. जखमा ताज्या होत्या आणि सैफ रक्तबंबाळ अवस्थेत होता. त्यांना अशा अवस्थेत पाहून मी आधी हादरलो होतो आणि विचार करत होतो की, लवकरात लवकर इथून निघून जायला पाहिजे. मी घाबरलो होतो. "

"मी रिक्षाचालक म्हणून काम करतो. सामाजिक कार्यकर्ते फैजान अन्सारी यांनी मला 11,000 रुपयांची मदत केली. सैफ अली खाननं मला 51 हजार रुपये देऊन आर्थिक मदत केली, पण मी कोणाकडेही मागितलं नाही. जर कोणी मला ते दिले तर मी ते घेतो.", असं ऑटो रिक्षा चालक भजन सिंह राणा म्हणाला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Alia Bhatt Attack On Saif Ali Khan: सैफ अली खानवर आलिया भट्टनं केलाय हल्ला? Viral VIDEO चं सत्य समोर, चाहत्यांमध्ये खळबळ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका

व्हिडीओ

Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
BMC Election Date 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Viral Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
Embed widget