Marathi Actress : 'बिग बॉस मराठी'मधील अभिनेत्री मोठ्या पडद्यावर झळकणार, आगामी सिनेमात साकारणार मुख्य भूमिका
Marathi actress : बिग बॉसमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रुचिरा जाधव ही आता एका नव्या सिनेमात दिसणार आहे.
Ruchira Jadhav : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) घरातून अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) ही महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. मालिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ही अभिनेत्री आता मोठ्या पडद्यावरूनही प्रेक्षकांचं मनोजरंजन करणार आहे. बाबू या सिनेमातून रुचिरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिनेमात ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाच्या तिच्यासोबत अंकित मोहन आणि नेहा महाजन देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.
मयूर शिंदे दिग्दर्शित 'बाबू' चित्रपट येत्या 2 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर आणि सॉन्ग लाँच सोहळा पुण्यात दिमाखात पार पडला. यावेळी 'बाबू' म्हणजेच अंकित मोहन याच्या 25 फूट भव्य पोस्टरचे अनावरण करण्यात आले. तर चित्रपटातील टायटल सॉन्गही या दरम्यान लाँच करण्यात आले.या सोहळ्यात अंकित मोहनने जेसीबीवरून जबरदस्त एन्ट्री करत टायटल साँगवर धमाकेदार परफॅार्मन्स सादर केला.
रुचिराची 'बाबू' सिनेमात महत्त्वाची भूमिका
रुचिरा या सिनेमात सुप्रियाची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. सुप्रियाचं पात्र कसं असणार याची उत्सुकता देखील चाहत्यांना लागून राहिली आहे. तसेच सुप्रिया आणि बाबू ही जोडी मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
View this post on Instagram
रुचिराने नुकतचं घेतलं नवं घर
रुचिराने नुकतच तिच्या हक्काचं घर घेतलं होतं. त्यानंतर आता अभिनेत्री पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे सध्या रुचिरा ही सोशल मीडियावरही बरीच चर्चेत असते. त्याचप्रमाणे बाबू या सिनेमात रुचिराची भूमिका कशी असणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.
View this post on Instagram