(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RRR Release Date : बहुप्रतिक्षित RRR चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, निर्मात्यांनी केला खुलासा
RRR Release Date : नुकताच प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड धूमाकूळ घातला. आता अनेक महिन्यांपासून प्रतिक्षित असणारा RRR हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
RRR Release Date : सध्या साऊथ चित्रपटांची तरूणाईत प्रचंड प्रमाणात क्रेझ निर्माण झाली आहे. या चित्रपटांचे कथानक तर चांगले असतेच. पण त्याचबरोबर चित्रपटाची स्टारकास्टही तगडी असल्यामुळे हे चित्रपट प्रेक्षकांना जास्त आकर्षित करतात. अशाच चित्रपटांत एक चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण तेजा (Ram Charan Teja) यांची मुख्य भूमिका असलेला RRR चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, 'देशातील कोरोना महामारीची परिस्थिती चांगली झाल्यास आणि सर्व चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने उघडल्यास RRR हा चित्रपट आम्ही 18 मार्च 2022 रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. अन्यथा, हा चित्रपट 28 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होईल. सध्या तरी, या दोन तारखा प्रचंड चर्चेत आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या सुपरस्टार्सचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
#BreakingNews... 'RRR' RELEASE DATE: OFFICIAL STATEMENT FROM PRODUCERS... 18 March or 28 April... Two dates blocked by the team... Read on... pic.twitter.com/Dgew09PIyP
— taran adarsh (@taran_adarsh) January 21, 2022
अलिकडच्या काळात, या चित्रपटाचे मुख्य कलाकार ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण तेजा (Ram Charan Teja) या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत होते. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे चित्रपटाचे प्रदर्शन तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टसुद्धा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Upcoming South Movies : RRR ते KGF 2 पर्यंत 'हे' धमाकेदार साऊथ सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार
- Samantha : नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटाबाबतची पोस्ट समंथाकडून डिलीट; दोघं पुन्हा एकत्र येणार?
- The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो' मध्ये गेल्यानं शैलेश लोढा ट्रोल; नेटकरी म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha