Riteish Deshmukh : विलासरावांनी काँग्रेस सोडली होती, तुम्ही जा आणि..., नेटकऱ्यांच्या प्रश्नाला रितेश देशमुखचं उत्तर
Riteish Deshmukh : विलासराव देशमुख काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. काँग्रेस सोडण्याचे त्यांच्या मनातही आले नाही, असं रितेश देशमुख याने म्हटलं होतं. त्याच्या याच विधानावर ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करण्यात आली आहे.
Riteish Deshmukh on Vilasrao Deshmukh : लातूरमधील (Latur) विलासराव सहकार कारखान्यात दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी अभिनेता दिग्दर्शक रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने देखील हजेरी लावली होती. तसेच विडिलांच्या आठवणीत भावूक झाल्याचं देखील पाहायला मिळालं. सध्या विलासरावांच्या बाततीत सोशल मीडियावर (Social Media) करण्यात आलेल्या एका ट्विटचं रितेशनं जशाच तसं उत्तर दिलं आहे. त्याच्या या उत्तराने सोशल मीडियावरही बऱ्याच पोस्ट होतायत.
विलासराव देशमुख काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. काँग्रेस सोडण्याचे त्यांच्या मनातही आले नाही, असं रितेश देशमुख याने म्हटलं होतं. त्याच्या याच विधानावर ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करण्यात आली आहे. पण या टीकेला रितेशने देखील त्याच भाषेत उत्तर दिलं आहे. लातूर येथील पुतळ्याच्या लोकार्पणावेळी रितेश भावूक झाल्याचं देखील पाहायला मिळालं. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अप्रत्यक्षपणे रितेशने भाष्य केलं.
रितेशने नेमकं काय म्हटलं?
विलासराव देशमुख यांनी काँग्रेस सोडली होती आणि विधानपरिषद निवडणूकीत सेना भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, अशा आशयाची पोस्ट करण्यात आली आहे. त्यावर उत्तर देताना रितेशने त्यांना म्हटलं की, हे साफ खोटं आहे, तुम्ही जा आणि आधी खरं काय आहे ते तपासा. रितेशच्या या उत्तरवर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. पण रितेशच्या या उत्तवर नेटकऱ्यांनी पुन्हा टीका केली. स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यात काहीच चुकीचं नाही, पण ही गोष्टी नाकारली का जातेय, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारलाय. यावर आता रितेश काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विलासराव देशमुख काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. काँग्रेस सोडण्याचे त्यांच्या मनातही आले नाही
— मी भारतीय (@Core_punekar) February 18, 2024
रितेश देशमुख
Fact:
विलासराव देशमुख यांनी काँग्रेस सोडली होती आणि विधानपरिषद निवडणूकीत सेना भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती
I am really surprised.
— मी भारतीय (@Core_punekar) February 18, 2024
There is nothing wrong in contesting election as independent but why deny it?
रितेश देशमुख झाला भावूक
अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना भावूक झाला. विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या आठवणीत रितेश देशमुखला रडू कोसळलं आणि रितेश उपस्थितांसमोर मंचावरच हुंदके देत रडू लागला. आज साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्ष झाली, हे सांगताना रितेशला भावना अनावर झाल्या आणि तो रडू लागला. यावेळी भाऊ अमित देशमुखने रितेशला सावक भाषण पुढे सुरु ठेवण्यास सांगितलं.
ही बातमी वाचा :
Riteish Deshmukh : रितेश देशमुख वडिलांच्या आठवणीत ढसाढसा रडला, हुंदके अन् अश्रू अनावर