एक्स्प्लोर

Riteish Deshmukh Loses His Temper In Lock Up 2: 'तू मला शिकवू नकोस... माझ्यासोबत हे नाटक...', रितेशभाऊचा संयम सुटला, राग विकोपाला पोहोचला, 'लॉकअप 2'मधल्या स्पर्धकावर चिडला VIDEO

Riteish Deshmukh Loses His Temper In Lock Up 2: रितेश देशमुख सध्या फराह खानसोबत एकता कपूरचा रिअ‍ॅलिटी शो 'लॉक अप 2' होस्ट करत आहेत आणि या शोमधील एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये रितेश देशमुख स्पर्धक योगेश रावतला खडसावताना दिसतोय.

Riteish Deshmukh Loses His Temper In Lock Up 2: एकता कपूरचा (Ekta Kapoor) रिअ‍ॅलिटी शो (Reality Show) 'लॉक अप 2' (Lock Upp 2) सध्या भलताच चर्चेत आहे. राम कपूरपासून (Ram Kapoor) ते शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) यांच्यासारखे लोकप्रिय सेलिब्रिटी यात स्पर्धक म्हणून सहभागी झालेत, तर आपल्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जाणारा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि दिग्दर्शिका फराह खान (Farah Khan) हे या शोचं सूत्रसंचालन करत आहेत. रितेश देशमुख म्हणजे, शांत आणि आनंदी स्वभावाचं व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखला जातो, पण 'लॉक अप 2'मध्ये त्याचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं. त्यामुळे त्याचे चाहतेही धास्तावले आहेत. सध्या सोशल मीडियावर या शोमधील एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये रितेश देशमुख कन्टेस्टंट योगेश रावत याला कठोर शब्दांत फटकारताना दिसतोय. रितेश देशमुखचा हा राग ओढवून घेण्यासारखं योगेश रावत (Yogesh Rawat) यानं नक्की काय केलं? जाणून घेऊयात.

रितेश का चिडला, नेमकं घडलं काय? (Riteish Deshmukh Loses His Temper Video)

नुकत्याच आलेल्या टीझरमध्ये आकांक्षा चमोला आणि पामेला एका सेलमध्ये होते, तर राम कपूर आणि श्रेया कालरा दुसऱ्या सेलमध्ये होते. दोन्ही गटात कंट्रोलर होण्यासाठी शा‍ब्दिक चकमक झाली. जे कंट्रोलर आहेत, त्यांना डिपेंडंटच्या वजनाएवढे बॉक्स धरायला सांगितलेले. पण, समोर आलेल्या प्रोमोमध्ये काहीतरी भलतंच दिसलं. कंटेस्टंट योगेश रावत होस्ट रितेश देशमुखशी नडताना दिसतो. यामुळे रितेश भडकतो. योगेश म्हणतो, "सर, जर हेच करायचं होतं तर..." त्याचं म्हणणं पूर्ण होत नाही, तेवढ्याच रितेश देशमुखला राग अनावर होतो. आणि तो खूप चिडतो म्हणतो,"तू मला शिकवू नकोस... माझ्यासोबत हे नाटक चालणार नाही..."

शोमधून बाहेर पडलेत 'हे' स्पर्धक (Lock Up Season 2 Reality Show)

'लॉक अप 2' (Lock Upp 2) मध्ये नुकतंच डबल एव्हिक्शन पार पडलं. एकाच वेळी दोन स्पर्धकांना शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. शनिवारी या रिअ‍ॅलिटी शोमधील दोन स्पर्धकांचा प्रवास संपला. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रियाझ अली आणि गोविंदा यांची पत्नी सुनीता आहुजा यांना या आठवड्यात शोमधून बाहेर काढण्यात आलं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुनीता आहुजा यांनी शो अर्धवट सोडला, तर रियाझला त्याच्या खेळण्याच्या पद्धतीमुळे शोमधून बाहेर पडावं लागलं. सुनीता आहुजा यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास, शोमध्ये प्रवेश केल्यापासून त्या सतत चर्चेत होत्या. त्यांच्या खेळालाही चांगली पसंती मिळत होती, पण त्यांनी नुकतंच सांगितलं की, त्या काही आरोग्यविषयक समस्यांचा सामना करत आहेत आणि त्यामुळे त्यांना शोमधून बाहेर पडण्याची इच्छा आहे.

'लॉक अप 2' मधील स्पर्धक (Lock Up 2 Contestants)

'लॉक अप 2' मधील स्पर्धकांचा विचार करता, यात टेलिव्हिजन आणि सोशल मीडियावरील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी सहभाग घेतला आहे. टीव्ही अभिनेते राम कपूर, शिल्पा शिंदे, शिवांगी जोशी आणि हर्षद चोपडा हे स्पर्धक म्हणून यात सामील झाले आहेत. तसेच, 'बिग बॉस 19' ची विजेती आणि टीव्ही अभिनेत्री आकांक्षा चमोला ही देखील या शोचा भाग आहे. त्याचबरोबर, आकांक्षा चौधरी, योगेश रावत, श्रेया कालरा आणि सुफी मोतीवाला हे देखील त्यांच्या खेळण्याच्या पद्धतीमुळे चर्चेत आहेत. रितेश देशमुख आणि फराह खान हे या सीझनचे सूत्रसंचालन करत असून, हा शो नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रसारित होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Praveen Tarde On Snehal Tarde: 'माझ्या पुढच्या कोणत्याच सिनेमात ती नसेल...'; 'देऊळ बंद 2'मध्ये गाजल्यानंतरही पत्नी स्नेहल तरडेला कास्ट करणार नाहीत, प्रवीण तरडेंनी कारण सांगितलं

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Embed widget