एक्स्प्लोर

रितेश आणि जिनिलियाला 'तुझे मेरी कसम' सिनेमा कसा मिळाला? सांगितली रंजक स्टोरी

रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि जिनिलिया डिसूजा (Genelia D'Souza)दोघांना ज्या सिनेमानं आयुष्यभरासाठी एकत्र आणलं तो सिनेमा म्हणजे तुझे मेरी कसम. हा सिनेमा दोघांना कसा मिळाला...

मुंबई : बॉलिवूडमधील लाडका अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया डिसूजा (Genelia D'Souza)ही जोडी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दोघांमधील प्रेम त्यानंतर लग्न आणि आतापर्यंतचा प्रवास जबरदस्त आहे. मात्र या दोघांना ज्या सिनेमानं आयुष्यभरासाठी एकत्र आणलं तो सिनेमा म्हणजे तुझे मेरी कसम. हा सिनेमा दोघांना कसा मिळाला याबाबत रितेश आणि जिनिलियानं एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात सांगितलं. ही फेव्हरेट जोडी दिवाळी पाडव्यानिमित्त एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या विशेष कार्यक्रमात आली आहे. यावेळी त्यांनी अनेक किस्से सांगितले आहेत. आज सायंकाळी चार वाजता हा कट्टा प्रसारित होणार आहे. 

'तू तुझ्या नावाची काळजी घे, मी माझ्या नावाची काळजी घेईन' विलासरावांचा तो सल्ला अन् रितेशचं आयुष्य बदललं

रितेशनं सांगितलं की,  तुझे मेरी कसम हा सिनेमा माझ्या आधी जिनिलियाला मिळाला. हा सिनेमा दुसरा अभिनेता करणार होता. तो अभिनेता त्यावेळी दुसरा सिनेमा करत होता. त्यावेळी त्या अभिनेत्याला एका सिनेमाची निवड करायला सांगितलं गेलं. त्यावेळी त्यानं दुसरा चित्रपट निवडला. मग या सिनेमासाठी निर्मात्यांना जिनिलियासोबत एक फ्रेश चेहरा हवा होता. मी एकदा सुभाष घई यांच्या सेटवर गेलो होतो. कारण मला फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटवर प्रोजेक्ट बनवायचा होतो. मला स्टुडिओ वगेरे काही माहिती नव्हतं. त्या कामासाठी गेलो असता तिथल्या डीओपीला वाटलं मी चित्रपटात अॅक्टिंग करायला आलो आहे. या घटनेच्या दीड वर्षानंतर मला फोन आला की, असा एक सिनेमा आहे त्यात काम कराल का? त्यावेळीही मी बघू असं सांगितलं. मला वाटलं आपल्या पुढच्या पीढीला सांगता येईल की, आपल्याला चित्रपटाची ऑफर मिळाली होती. त्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी डन असं सांगितलं. मग मीच त्यांना म्हणालो जरा थांबा, मला घरी याबाबत बोलावं लागेल. मला जाणिव होती की आपले वडील मुख्यमंत्री आहेत. आपण असंच निर्णय घेऊ शकत नाही. आईला सांगितल्यावर त्यांनी होकार दिला. 

जिनिलियासोबत भांडणं झाल्यानंतर रितेशची भन्नाट ट्रिक, माझा कट्ट्यावर सांगितलं गुपित 

रितेशनं सांगितलं की, मी हैदराबादला लूक टेस्टला गेलो होतो.  मला सांगण्यात आलं की हिरोईन देखील त्याच विमानानं येणार आहे. आम्ही विमानातून उतरल्यानंतर प्रोडक्शनच्या एका व्यक्तिनं आमची ओळख करुन दिली. त्यावेळी मी जिनिलियाला HI केलं तर तिनं अॅटिट्यूड दाखवत Hello असं म्हटलं, असं रितेशनं सांगितलं. यावर जिनिलिया म्हणाली की, मी विचार केला की, मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. तो अॅटिट्यूड दाखवेल, त्याआधी मीच अॅटिट्यूड दाखवला.  रितेशनं सांगितलं की, दोन दिवसानंतर आम्ही शूटिंगच्या ठिकाणी भेटलो. तिथं जिनिलियानं तिथं असलेल्या झाडीकडे इशारा करत मला विचारलं की, त्या झाडीच्या पाठीमागे तुमचे बॉडिगार्ड आहेत का? पण मी सांगितलं की माझ्याकडे बॉडिगार्ड नाही. विलासराव देशमुख आठ वर्ष मुख्यमंत्री असताना मला एकदाही सेक्युरिटी नव्हती, असं रितेश म्हणाला. मी ही कधीच मागितली नाही, त्यानंतर जिनिलियाला वाटलं की आता आपण याच्याशी बोलू शकतो, असं त्यानं सांगितलं.

जिनिलियानं सांगितलं की, त्यानंतर आम्ही फेब्रुवारी 2002 पासून आम्ही डेटिंग केली. त्यानंतर फेब्रुवारी  2012 साली आम्ही दहा वर्षानंतर लग्न केलं. आम्ही लॉन्ग डिस्टंस रिलेशनशिप होतं. आम्ही टाऊनला भेटायचो लपूनछपून. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. 

यावेळी रितेश म्हणाला की, आपल्याला चित्रपटाची ऑफर मिळाली होती. त्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी डन असं सांगितलं. मग मीच त्यांना म्हणालो जरा थांबा, मला घरी याबाबत बोलावं लागेल. मला जाणीव होती की आपले वडील मुख्यमंत्री आहेत. आपण असंच निर्णय घेऊ शकत नाही. आईला सांगितल्यावर त्यांनी होकार दिला. मग मी बाबांना भेटायला गेलो. वर्षा बंगल्यावर त्यांना भेटलो आणि चित्रपट करणार असल्याचं सांगितलं. त्यावर ते म्हणाले तू अॅक्टिंग करणार आहेस का? मी हो असं सांगितलं. त्यानंतर मी त्यांना म्हटलं की, सिनेमा चालला नाही तर लोकं विलासरावांच्या मुलाचा सिनेमा चालला नाही असं म्हणत तुमच्यावर टीका होईल. माझी काही ओळख नाही, तुमची ओळख आहे. त्यावर ते (विलासराव देशमुख) की, तू तुझ्या नावाची काळजी घे मी माझ्या नावाची काळजी घेईल. तुम्हाला जे आयुष्यात करायचं आहे त्याची जबाबदारी आपणच घ्यायला हवी, असं रितेशनं सांगितलं. त्यानंतर ही फिल्म फायनल झाली, असं रितेशनं सांगितलं.  

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget