एक्स्प्लोर

Riteish Deshmukh Angry: सलमान अन् संजय दत्तच्या लॉकअप अनुभवावरून डिवचलं; नव्या शोच्या लाँचमध्येच रितेश देशमुख भडकला; दिलं सडेतोड उत्तर

‘लॉक अप: सच या सजा’च्या लाँचदरम्यान रितेश देशमुख संतापला. सलमान खान-संजय दत्तवर विचारलेल्या प्रश्नावर सडेतोड उत्तर दिलं

Riteish Deshmukh Angry on Salman Sanjay Lockup Question:मराठी मनोरंजनसृष्टीत 'राजा शिवाजी' सारखा चित्रपट दिल्यानंतर आता अभिनेता  रितेश देशमुख (Riteish Deshmukh) पुन्हा एकदा चर्चेत आलाय. यावेळी कारण आहे, त्याच्या नव्या शोचं. रितेश देशमुख आणि फराह खान होस्ट करत असलेल्या लॉक अप: सच  की सजा'च्या दुसऱ्या सीझनचा भव्य लाँच नुकताच पार पडला. नेटफ्लिक्सवर प्रीमियर होण्याआधीच या शोची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, लाँचदरम्यान झालेल्या एका प्रश्नोत्तर सत्रात रितेश देशमुख एका पत्रकाराच्या प्रश्नावर संतापलेला दिसला. याची सध्या मनोरंजनसृष्टीत एकच चर्चा रंगली आहे. संजय दत्त आणि सलमान खानच्या लॉक अपच्या अनुभवावरून हा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता.

नेमकं झालं काय?

कार्यक्रमात एका पत्रकाराने रितेशला विचारलं, “सलमान खान आणि संजय दत्त हे तुमचे जवळचे मित्र आहेत. त्यांना लॉकअपचा अनुभवही आहे. मग तुम्ही त्यांना नेटफ्लिक्सच्या ‘लॉक अप’मध्ये आणाल का? आणि त्यांना कशी शिक्षा द्याल?” हा प्रश्न रितेशला अजिबात पसंत पडला नाही. त्यावर त्याने स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं, “सर्वात आधी मला वाटत नाही की तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊन मी त्याला काही प्रतिष्ठा द्यायला हवी. मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही द्यायचं” असंही रितेशने स्पष्ट सांगितलं. तरीही त्याला पुन्हा विचारण्यात आलं की, सलमान आणि संजयला शोमध्ये बोलवण्याची इच्छा आहे का? त्यावर रितेशने ठामपणे सांगितलं, “मी त्यांना आणणार नाही. माझं काम फक्त होस्टिंग करणं आहे. शोमध्ये कोण सहभागी होणार, हे मला माहीत नसतं. ‘लॉक अप’मध्ये जे गेस्ट येतात, त्यांच्याशी आम्ही संवाद साधतो.” असं रितेश म्हणाला.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Movie Talkies (@movietalkies)

यावेळी नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट हेड मोनिका शेरगिल देखील उपस्थित होत्या. त्यांनी गंमतीशीर अंदाजात म्हटलं,“जर कधी तुरुंगात जावं लागलं, तर फराह खान आणि रितेश देशमुखसारखे मनोरंजक जेलर दुसरे कुठे मिळणार नाहीत. फराहपासून काहीही लपवणं अशक्य आहे, आणि रितेश तुम्हाला हसवत हसवत तुमची क्लास घेईल.” दरम्यान, ‘लॉक अप: सच या सजा’चा नवा सीझन येत्या 27 जून 2026 पासून Netflix वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शोच्या नव्या सीझनमध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार, याकडे आता चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

नेमका काय आहे हा शो?

Netflix वरचा हा एक दमदार आणि वेगळ्या धाटणीचा रिअॅलिटी शो आहे. यात ज्या व्यक्तींना आपण ओळखतो असं वाटतं, ते जेंव्हा स्वतःचं खरं रूप दाखवायला भाग पाडलं जातं. त्यानंतर नेमकं काय घडतं? हे दाखवणारी या शोची थीम आहे. Netflix आणि बालाजी टेलीफिल्मस यांची ही संयुक्त निर्मिती असलेल्या या शोमध्ये जागतिक प्रेक्षकांना खेचून आणण्यासाठी भव्य सेट डिझाइन, गुंतागुंतीचा गेमप्ले, भावनिक प्रेशर आणि प्रत्येक क्षणी अनपेक्षित घडामोडी घडवून आणल्या जातात. या शोमध्ये रितेश देशमुख आणि फराह खान ‘जेलर’च्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या देखरेखीखाली 14 प्रसिद्ध सेलिब्रिटी ‘कैदी’ म्हणून एका तुरुंगासारख्या वातावरणात राहणार आहेत. भारतीय रिअॅलिटी मनोरंजन क्षेत्रात याआधी असा प्रयोग पाहायला मिळालेला नाही. मात्र हा शो फक्त तुरुंगातून टिकून राहण्याचा खेळ नाही. यात प्रतिमा जपणे, कबुलीजबाब आणि सत्य यावर फोकस असेल.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Singer in India: पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
Trisha Krishnan with Vijays Parents: विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
Amitabh Bachchan on Dharmendra: धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा
धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा
Awarapan 3: 'आशा आहे की 'आवारापन'चा तिसरा पार्ट...'; इम्रान हाश्मीचा प्रेक्षकांना सरप्राइज, सिनेमाचा तिसरा पार्ट येणार?
'आशा आहे की 'आवारापन'चा तिसरा पार्ट...'; इम्रान हाश्मीचा प्रेक्षकांना सरप्राइज, सिनेमाचा तिसरा पार्ट येणार?
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Embed widget