एक्स्प्लोर

SSR Case: ड्रग्स प्रकरणी रियासह सर्व आरोपींचा जामीन फेटाळला

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आलं आहे. रियाचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयने फेटाळला आहे. रिया सध्या भायखळा जेलमध्ये आहे.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातली मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीसह एकूण सहा जणांचा जामीन अर्ज शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावला, ज्यात रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, सुशांतचा नोकर दिपेश सावंत आणि ड्रग्ज पेडलर झैद विलात्रा आणि बासित परिहार यांचा समावेश आहे. निकालाची प्रत हाती येताच मुंबई उच्च न्यायालयात सोमवार किंवा मंगळवारी या निकालाला आव्हान देऊ असं या आरोपींच्या वकिलांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात अनुज केसवानी व्यतिरिक्त इतर आरोपींना बुधवारी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, केसवानीला पुढील तपासासाठी एनसीबी कोठडीत ठेवण्यात आलं आहे.

एनडीपीएस कलमाखाली या सर्वांवर विविध आरोप लावण्यात आले आहेत. रिया चक्रवर्तीची रिमांड जरी एनसीबीने मागितली नसली तरी, 'आमचा तपास अजून संपलेला नाही' असं एनसीबीच्यावतीनं कोर्टात सांगण्यात आलं आहे. तसेच रिया आणि तिचा भाऊ शौविक यांच्यावर ड्रग्जचा व्यवसाय केल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. तसेच इतरांचा या संपूर्ण प्रकरणात सक्रीय सहभाग आहे, त्यामुळे या कलमांअंतर्गत कोर्टाने त्यांना जामीन देऊ नये असा दावा एनसीबीच्यावतीनं विशेष सरकारी वकील अतुल सरपांडे यांनी कोर्टात केला. दरम्यान एनसीबीने या प्रकरणातील आणखी एक आरोपी कैझान इब्राहिम याला दंडाधिकारी कोर्टानं दिलेला जामीन रद्द करण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे.

Rhea Chakraborty Arrested: रिया चक्रवर्ती दोषी आढळल्यास किती वर्ष शिक्षा होऊ शकते?

28 ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या अंमली पदार्थविरोधी पथक(एनसीबी)च्या विशेष पथकाने शोविक, मिरांडा आणि दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अंमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन जप्त केले होते. अखेर याप्रकरणात मंगळवारी एनसीबीकडून ड्रग्ज सेवन आणि इतर आरोपांखाली रियालाही अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयानं रियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत तिचा जामीन अर्जही फेटाळून लावला. त्याविरोधात रियाच्यावतीने अॅड. सतीश मानेशिंदे यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला. आपण निर्दोष असून आपण कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही. यात आपल्याला गुंतवण्यात आले असून तपासयंत्रणेकडून गुन्हा कबूल करण्यास भाग पाडण्यात आल्याचंही या याचिकेतून नमूद करण्यात आलं होतं. रियाने ड्रग्सचे सेवन केले असले तरीही तिने ड्रग्स रॅकेटला आर्थिक मदत केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. ड्रग्स सेवन हा जामीन पात्र गुन्हा आहे. असा दावा या याचिकेतून करण्यात आला होता.

Rhea Chakraborty NCB Arrest : रिया चक्रवर्तीची तुरुंगातील पहिली रात्र कशी होती?

मागील काही दिवसांपासून रियाला लैंगिक अत्याचाराच्या तसेच जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे तिला जर कोठडी मिळाली तर तिच्या जीवाला धोका संभवू शकतो असं या याचिकेतून म्हटले आहे. तसेच रिया तपासकार्यात संपूर्ण सहकार्य करत आहे, त्यामुळे तिचे मानसिक संतुलन, सुरक्षितता आणि कोरोनाची पार्श्वभूमी पाहता रियाला जामीन मिळावा, अशी मागणी कोर्टाकडे करण्यात आली होती.

आता रिया चक्रवर्तीकडे मुंबई हायकोर्टात जामिनासाठी जाण्याचा पर्याय आहे. मात्र जोवर जामिन मिळत नाही तोवर रियाला भायखळा जेलमध्ये राहावं लागणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Rahul Gandhi: बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं

व्हिडीओ

Gautami Patil Coffee With Kaushik : दादांच्या आठवणीने डोळ्यात पाणी, राधा पाटीलला म्हणाली...
Ganesh Naik :चांगलं काम केलं नाही तर मंत्रिपद चाटायचं का? नगरविकास खात्यातील लोकांचं कर्मदरिद्री काम
Sanjay Raut on Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Vaishnavi Hagavane Case :वैष्णवी हगवणे प्रकरणात सहा जणांवर आरोप निश्चित
Sunetra Pawar Janta Darbar : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचा आज बारामतीत पहिला जनता दरबार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Rahul Gandhi: बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
Bombay High court on Palash Muchchal Case: पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
Sanjay Raut: अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे अमित शाहांच्या हातात, प्रफुल पटेल शाह सांगतात तेच बोलतात, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार नाही: संजय राऊत
प्रफुल पटेल अमित शाहांना हवं तेच बोलतात, राष्ट्रवादी काँग्रेसचा कंट्रोल अमित शाहांकडे: संजय राऊत
Embed widget