एक्स्प्लोर

बॉलिवूड अभिनेता तब्बल 5 मिनिटं किस करत राहिला, दिग्दर्शकानं कट म्हणताच... अभिनेत्री सर्वांसमोरच ढसाढसा रडायला लागली, काय आहे 'तो' किस्सा?

Bollywoods Oldest Kissing Controversy: 'अंजाना सफर' किसिंग सीनमुळे गाजला. किसिंग सीननंतर रेखा सर्वांसमोर ढसाढसा रडली.

Bollywoods Oldest Kissing Controversy: चित्रपटसृष्टीत सध्या बऱ्याच चित्रपटांमध्ये किसिंग किंवा इंटीमेट सीन्स दाखवले जातात. या सीन्सची चर्चा देखील होते. बऱ्याचदा इंटीमेट सीन्समुळे वाद देखील होतात. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्ममधील वेब सिरीजमध्ये सर्रास किसिंग आणि इंटीमेट सीन्स दाखवले जात आहेत. परंतु, पूर्वीच्या चित्रपटांमध्ये किसिंग आणि इंटीमेट सीन्सचे प्रमाण कमी होते. पूर्वी किसिंग सीनला टॅब्यू टॉपिक मानले जात होते. परंतु,  पूर्वीच्या एका चित्रपटातील किसिंग सीनची चर्चा आजही होते.  55 वर्षांपूर्वी  प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटात किसिंग सीन दाखवण्यात आला होत.  या चित्रपटात अभिनेता नकळत अभिनेत्रीला किस करत राहिला. पण त्यानंतर अभिनेत्रीला रडू कोसळलं.  त्या सीनदरम्यान नेमकं काय घडलं?जाणून घेऊयात.

'अंजाना सफर'  या चित्रपटाची किसिंग सीनमुळे चर्चा

70च्या दशकातील चित्रपटात रोमॅण्टिक सीन दाखवताना  एक फूल किंवा  हंसांची जोडी दाखवण्यात यायचे. तेव्हा चुंबनाचे दृष्य उघडपणे दाखवली जात नव्हती.  मात्र, 55 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या  'अंजाना सफर' या चित्रपटात किसिंग सीन दाखवण्यात आला होता.  या चित्रपटात अभिनेत्री रेखा आणि विश्वजीत चॅटर्जी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्याकाळी या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती.  किसिंग सीनमुळे हा चित्रपट खूप गाजला होता.  दरम्यान, या किसिंग सीनचा उल्लेख पत्रकार यासिर उस्मानद्वारे लिखित रेखा यांच्या बायोपिक 'रेखा द: अनटोल्ड स्टोरी' मध्ये करण्यात आला आहे.

किसिंग सीन नंतर रेखाला रडू कोसळलं

दिग्दर्शक राजा नवादे यांनी  किसिंग सीनसाठी अॅक्शन म्हणताच, अभिनेता विश्वजीत यांनी रेखा यांच्या ओठांवर चुंबन घेण्यास सुरूवात केली. 5 मिनिटांनंतर दिग्दर्शकाने या दृश्यासाठी कट म्हटले.  तेव्हा अभिनेता थांबला. दरम्यान, या दृश्यानंतर अभिनेत्रीला रडू कोसळलं.  असं म्हटलं जातं की, रेखा यांना या सीनबाबत माहिती देण्यात आली नव्हती.    म्हणूनच रेखा आणि विश्वजीत चॅटर्जी  यांच्यात चित्रित केलेला हा लिपलॉक दृश्य बॉलिवूडमधील सर्वात वादग्रस्त किसिंग सीनपैकी एक आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार,'अंजाना सफर' हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाने मंजूर करण्यापूर्वी 10 वर्षे रोखून धरला होता. नंतर या चित्रपटाचे शीर्षक बदलल्यानंतर, हा चित्रपट प्रदर्शित झाला. या सीनमुळे 'अंजाना सफर' या चित्रपटाची प्रचंड चर्चा झाली होती. त्या काळी हा चित्रपट गाजला. या सीनबाबत आजही सिनेसृष्टीत चर्चा होते.

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget