एक्स्प्लोर

Pawankhind : शिवकालीन इतिहासातील सुवर्णपान, 'पावनखिंड'मध्ये दिसणार रायाजी-कोयाजी बंधूंचा थरारक लढा!

Marathi Movie : हिरडस मावळामध्ये रायाजीराव बांदल आणि कोयाजीराव बांदल यांच्या रूपात स्वराज्याला जणू दोन हिरेच गवसले. शूरवीर, धाडसी, निडर, वचनाला जागणारे आणि राजांसाठी प्राणांची बाजी लावणारे असे कितीतरी गुण या बांदल बंधूंच्या अंगी ठासून भरले होते.

Pawankhind Movie : शिवकालीन इतिहासातील सुवर्णपान असणाऱ्या 'पावनखिंड'चा (Pawankhind) उल्लेख येताच बाजीप्रभू देशपांडे यांच्या जोडीला आणखी दोन शूरवीरांची नावं अनाहूतपणे समोर येतात. शिवचरित्रातील या महत्त्वपूर्ण अध्यायातील दोन अजरामर नावं म्हणजे श्रीमंत कोयाजीराव बांदल आणि श्रीमंत रायाजीराव बांदल...

लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेतून पडद्यावर आलेल्या 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या चित्रपटांनंतर 'पावनखिंड' हा तिसरा महत्त्वाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पावनखिंडीचा रक्तरंजीत इतिहास सांगणाऱ्या या चित्रपटात कोयाजीराव आणि रायाजीराव या बांदल बंधूंनी दिलेल्या बलिदानाची आणि त्यांच्या शौर्याची गाथाही पहायला मिळणार आहे. 18 फेब्रुवारीला 'पावनखिंड' चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

बांदल बंधूंची ओळख

‘भूपा हिर्दसो भ्धुतः प्रभुत भिजन प्रियाः। मज्जैत्र यत्रा: कुर्णवा: प्रोल्लो सान्ति पदे पदे।।’ याचा अर्थ असा आहे की, 'हिरडस मावळाचे लोकप्रिय राजे बांदल माझी विजययात्रा यशस्वी करत करत प्रत्येक पावलाला माझ्या सैन्याचा उत्साह वाढवत आहेत’, असं ज्यांच्याबद्दल स्वत: छत्रपती संभाजी महाराजांनी म्हटले आहे. हिरडस मावळामध्ये रायाजीराव बांदल आणि कोयाजीराव बांदल यांच्या रूपात स्वराज्याला जणू दोन हिरेच गवसले. शूरवीर, धाडसी, निडर, वचनाला जागणारे आणि राजांसाठी प्राणांची बाजी लावणारे असे कितीतरी गुण या बांदल बंधूंच्या अंगी ठासून भरले होते.

पराक्रमी बंधूंचा थरारक लढा

त्या काळरात्री बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू यांच्यासह रायाजीराव बांदल यांनी आपल्या 300 कडव्या बांदल सेनेच्या साथीने घोडखिंड अडवून धरली आणि पराक्रमाची शर्थ करीत अखेरच्या श्वासापर्यंत गनिमांची वाट रोखून ठेवली. 'पावनखिंड' चित्रपटात बाजीप्रभूंनी दिलेल्या बलिदानाच्या निमित्तानं रायाजीराव-कोयाजीराव या दोन पराक्रमी बंधूंचा थरारक लढाही पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेते अजय पूरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली असून, अंकित मोहन यांनी रायाजीराव बांदल तर अक्षय वाघमारे यांनी कोयाजीराव बांदल यांची भूमिका साकारली आहे.

कलाकारांची तगडी फौज

ए.ए.फिल्म्स प्रस्तुत आणि आलमंड्स क्रिएशन्स निर्मित 'पावनखिंड' ची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे. दिग्दर्शनासोबतच 'पावनखिंड' या चित्रपटाचं लेखनही दिग्पाल लांजेकरनं केलं आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात दिसणार असून, मृणाल कुलकर्णीही राजमाता जिजाऊ बनल्या आहेत. याखेरीज वैभव मांगले, हरीश दुधाडे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, सचिन भिलारे, बिपीन सुर्वे आदी कलाकारांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.

संबंधित बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget