Rashmika Mandanna : अखेर तो सापडलाच! रश्मिकाचा डीपफेक बनवणाऱ्या आरोपीला दिल्ली पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Rashmika Mandanna : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड सेलिब्रिटी ते दिग्गज खेळाडूंपर्यंत अनेकांचे डीपफेक व्हिडिओ बनवण्यात आले. याची सुरुवात अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) डिपफेक (Deepfake Video) व्हिडिओपासून झाली होती.
Rashmika Mandanna : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड सेलिब्रिटी ते दिग्गज खेळाडूंपर्यंत अनेकांचे डीपफेक व्हिडिओ बनवण्यात आले. याची सुरुवात अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) डिपफेक (Deepfake Video) व्हिडिओपासून झाली होती. दरम्यान आता पोलिसांनी या प्रकरणी कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली पोलिसांनी रश्मिकाचा डिपफेक बनवणाऱ्या व्यक्तीस अटक केली आहे. अटक करण्यात आलेली व्यक्ती 23 ते 24 वयाची आहे. नोव्हेंबर महिन्यापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. अखेर पोलिसांना यश आलं आहे. रश्मिकानंतर आलिया भट, कोजोल आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचेही डीपफेक व्हिडिओ बनवण्यात आले होते.
दिल्ली पोलिसांचे थेट आंध्र प्रदेशमध्ये कारवाई
दिल्ली पोलिसांनी शनिवारी (दि.20) रश्मिकाचा डीपफेक बनवणाऱ्या आरोपीला अटक केली. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या युनिटने म्हणजेच IFFSO ने आंध्र प्रदेशमधून या व्यक्तीला अटक केली आहे. रश्मिकाचा 6 डिसेंबरमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये रश्मिकाचा चेहरा दिसत होता. त्यानंतर रश्मिकाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चिंता व्यक्त केली होती. ब्रिटिशा इन्फ्ल्युंसर जारा पटेलच्या बॉडीला रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला होता.
पुष्पा आणि अॅनिमलसारख्या हिट चित्रपटात काम केल्यानंतर रश्मिकांच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. मात्र, डीपफेकचे प्रकरण समोर आल्यानंतर तिने चिंता व्यक्त केली. रश्मिका तेव्हा म्हणाली होती की, हा व्हिडिओ पाहून फार वाईट वाटत आहे. रश्मिकाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सोशल मीडियावर अशा स्वरुपाचे कृत्य केल्यास काय कारवाई याबाबत इशारा दिला होता.
सचिन आणि सोनू सुदही डीपफेकचे शिकार
अभिनेता सोनू सुदचाही (Sonu Sood) डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये फसवणूक करणारा व्यक्ती लोकांना पैसे मागताना दिसत होता. सोनू सुदने व्हिडिओ शेअर करुन स्वत: याबाबतची माहिती दिली होती. काही दिवसांपूर्वी एका अॅपच्या जाहिरातीसाठी सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) डीपफेकचा वापर करण्यात आला होता. मात्र, सोनू सुदचे (Sonu Sood) प्रकरण वेगळे होते. या डीपफेकमधून सामान्य लोकांकडून पैशाची मागणी केली जात होती. सोनू सुदच्या नावाने लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार सुरु होता.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या