Ranveer Deepika Share Duas First Picture: दीपिका पादुकोण, रणवीर सिंहकडून चाहत्यांसाठी दिवाळीचं गोड सरप्राईज; लेक दुआसोबतचे PHOTOs शेअर
Ranveer Deepika Share Duas First Picture: दीपिका आणि रणवीरनं दुआसोबतचे फोटो शेअर करताच सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला.

Ranveer Deepika Share Duas First Picture: बॉलिवूडच्या (Bollywood News) मोस्ट फेवरेट कपल्सपैकी एक असलेलं कपल म्हणजे, रणवीर सिंह (Ranveer Singh) - दीपिका पादुकोण (Deepika Padukone). दोघांनीही दिवाळीच्या दिवशी आपल्या चाहत्यांना गोड सरप्राईज दिलं. या जोडप्यानं त्यांची मुलगी दुआ पादुकोन-सिंहचा (Dua Padukone-Singh) पहिला फोचो सोशल मीडियावर शेअर केला आहे. दीपिका आणि रणवीरनं दुआसोबतचे फोटो शेअर करताच सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला. 8 सप्टेंबर 2024 रोजी जन्मलेली दुआ आता एक वर्षाची झालीय, दुआचा निरागस चेहरा पाहून नेटकरी भलतेच खूश झाल्याचं पाहायला मिळालं.
दुआनं आई दीपिका, बाबा रणवीर यांच्यासोबत केली दिवाळीची पूजा
दिवाळीच्या खास प्रसंगी शेअर केलेल्या या फोटोमध्ये दुआ ट्रेडिशनल अंदाजात दिसली. फोटोमध्ये दुआ आणि तिचे आई-वडील दिवाळीनिमित्त एकत्र पूजा करताना दिसले. रणवीर आणि दीपिकानं फोटोला कॅप्शन दिलं आहे, 'दिवाळीच्या शुभेच्छा'. या फोटोनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. चाहत्यांनी कमेंटमध्ये प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. काहींनी दुआला 'छोटी परी' असं म्हटलं, तर काहींनी रणवीर आणि दीपिकाला 'सुपर मॉम अँड सुपर डॅड' असं म्हणत अभिनंदन केलं.
View this post on Instagram
दुआच्या जन्मानंतर बदललं रणवीर-दीपिकाचं आयुष्य
दुआच्या जन्मापासून, रणवीर आणि दीपिकाचं आयुष्य आनंदानं बहरलं. त्यांनी त्यांच्या मुलीसोबत अधिक वेळ घालवता यावा यासाठी त्यांच्या व्यावसायिक जीवनातही बदल केलेत. दीपिकानं तिच्या चित्रपटाचं शूटिंग 8 तासांच्या शिफ्टपर्यंत मर्यादित केलं आहे, जेणेकरून ती दुआसोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकेल.
चाहत्यांकडून फोटोवर लाईक्सचा वर्षाव
रणवीर-दीपिका आणि दुआचा एकत्र फोटो पाहिल्यानंतर केवळ चाहतेच नाही तर, अनेक बॉलिवूड स्टार्सनीही रणवीर आणि दीपिकाचं अभिनंदन केलं आहे. सोशल मीडियावरील चाहत्यांनी 'दुआ खूप गोंडस आहे' आणि 'रणवीर आणि दीपिकाच्या कुटुंबाचा क्षण पाहणं हृदयस्पर्शी आहे', अशी कमेंट केली आहे.























