Beauty Queen Of Indian Cinema: इंडस्ट्रीची अप्सरा होती 'ही' सुंदर अभिनेत्री; स्वतःच्याच बंगल्यात झालेली हत्या, बदला घेण्यासाठी ड्रायव्हरनंच घरात घुसून केलेले 17 वार
Beauty Queen Of Indian Cinema: अप्सरेसारखी सुंदर होती ही अभिनेत्री, वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी झालेली हत्या, बदला घेण्यासाठी ड्रायव्हरनंच घरात घुसून केलेले 17 वार

Beauty Queen Of Indian Cinema: भारतीय सिनेसृष्टीत (Indian Cinema) अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी अनेक कठीण प्रसंगाचा सामना करुन इंडस्ट्रीत मोठं यश मिळवलं आहे. अशाच एका अभिनेत्रीबाबत (Bollywood Actress) आज आपण बोलणार आहोत, जी अगदी अप्सरेसारखी सुंदर होती. आईसुद्धा इंडस्ट्रीत होती, मुलीला सिनेस्टार बनवण्याचं स्वप्न आईनं तिच्या जन्मापासूनच पाहिलेलं. त्यामुळे त्यांनी तिचं संगोपनंही तसंच केलं. लहानपणापासूनच तिला डान्स शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर मोठं झाल्यावर तिला मुंबईत आणलं.
आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत होत, त्या म्हणजे, साऊथ सुपरस्टार अभिनेत्री राणी पद्मिनी (Actress Rani Padmini). ज्यांचं पाहाताचक्षणी घायाळ करणारं सौंदर्य अतुलनिय होतं. त्यांना अप्सरा म्हटलं जायचं. पद्मिनी म्हणजे, डबिंग स्टार इंद्रा कुमारी यांची मुलगी. 1962 मध्ये त्यांचा जन्म झाला. इंद्रा यांना त्यांची मुलगी एके दिवशी चित्रपटसृष्टीतील एक सुपरस्टार हिरोईन बनावी असं वाटत होतं. त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव पद्मिनी ठेवलं.
आधी खूप स्ट्रगल केलं नंतर नशीब चमकलं अन्... (Indian Actress Rani Padmini)
इंद्रा आणि तिची मुलगी पद्मिनी यांनी मुंबईत खूप संघर्ष केला, पण काहीही काम झालं नाही. दोघींनीही हार मानली नाही. 1981 मध्ये पद्मिनीला 'वलंगम वीणायम' या चित्रपटातून मल्याळम चित्रपटसृष्टीत ब्रेक मिळाला. या चित्रपटात तिनं एक छोटीशी भूमिका साकारली. त्यानंतर पद्मिनीला 'शंकरशम' हा चित्रपट मिळाला. त्यानंतर पद्मिनीसाठी चित्रपटसृष्टीचे दरवाजे उघडले. तिनं दक्षिणेतील सुपरस्टार मोहनलाल आणि मामूटी यांच्यासोबतही काम केलं. त्यानंतर तिनं माइक मोहन, कार्ती आणि राजकुमार सेतुपती सारख्या स्टार्ससोबत काम केलं. तमिळ चित्रपटसृष्टीत, पद्मिनीनं तिचं नाव पद्मिनीवरून राणी पद्मिनी असं बदललं. पद्मिनीनं कन्नड, मल्याळम आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील सुमारे 60 चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
एका घटनेनं बदललं संपूर्ण आयुष्य... (Rani Padmini Life Story)
पद्मनी हळूहळू यशाची एक-एक पायरी चढत होती आणि आर्थिक सुबत्ताही येत होती. पैसे आल्यानंतर अभिनेत्रीनं चेन्नईच्या अन्ना नगरमध्ये सहा खोल्यांचा एक आलिशान बंगला खरेदी केला आणि तिथे ती आपल्या आईसोबत राहायची. यानंतर अभिनेत्रीनं वृत्तपत्रात जाहिरात दिली की, तिला एक स्वयंपाकी, वॉचमन आणि ड्रायव्हर हवा आहे. एक दिवस, पद्मिनी शूटिंगवरुन घरी परतत असतानाच तिच्या ड्रायव्हरनं तिला थोबाडीत मारलेलं. त्यानंतर अभिनेत्रीनं लगेचच त्याला नोकरीवरुन काढून टाकलं. त्यानंतर ड्रायव्हर मात्र सूड घेण्यासाी संधी शोधत राहिला. त्यानं वॉचमनसोबत अभिनेत्रीच्या घरात चोरीचा प्लान आखला. ड्रायव्हरनं एक मोठा चाकू खरेदी केला आणि ठरलेल्या रात्री अभिनेत्रीच्या घरात घुसला. त्यावेळी अभिनेत्रीच्या आईनं ड्रायव्हरला पाहिलं, त्यानंतर हातातल्या चारूनं सपासप वार केले. त्यावेळी आईच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून अभिनेत्री तात्काळ तिच्याकडे धावली. तेवढ्याच ड्रायव्हरनं अभिनेत्रीला गाठलं आणि तिच्या छातीवर 17 वार केले. इंडस्ट्रीत राणीप्रमाणे वावरणाऱ्या अभिनेत्रीचा वयाच्या अवध्या 23व्या वर्षी करुण अंत झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























