Rakul Preet singh:रकुल प्रीत सिंह जंगल सफारीला गेली अन् बंदी असलेल्या ठिकाणी फिरताना दिसली; Viral Video मुळे वाद, शेवटी वन विभागानं केलं ट्वीट अन्...
Rakul Preet Singh: गिर नॅशनल पार्क आणि सासन अभयारण्यासारख्या संरक्षित जंगल भागात सफारीदरम्यान पर्यटकांना गाडीतून उतरायला परवानगी नसते. त्यामुळे रकुलचा व्हिडीओ येताच तिने नियम मोडल्याची चर्चा रंगली.

Rakul Preet Singh: बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग(Rakul Preet Singh) सध्या तिच्या आगामी 'पती पत्नी और वो 2' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रकुल प्रीत सिंह हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. गिर नॅशनल पार्कजवळ सफारीदरम्यान (Gir Jungle Safari) रकुल गाडीतून खाली उतरल्याचं दिसल्यानंतर अनेकांनी तिने जंगलातील नियम मोडल्याचा आरोप करत ट्रोल केलं. मात्र, आता वन विभागाने याबाबत स्पष्ट भूमिका मांडत संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकला आहे.
रकुल प्रीतच्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ती आणि तिची टीम गुजरातच्या प्रसिद्ध गिर राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीसाठी गेले होते. मात्र, या सफारीमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चांगलाच वाद निर्माण झालाय. या व्हिडिओमध्ये रकुल अभयारण्यात सक्ती असलेल्या ठिकाणी सफारी जीपच्या बाहेर फिरताना दिसत असल्याचं दिसलं.या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. गिर नॅशनल पार्क आणि सासन अभयारण्यासारख्या संरक्षित जंगल भागात सफारीदरम्यान पर्यटकांना गाडीतून उतरायला परवानगी नसते. त्यामुळे रकुलचा व्हिडीओ समोर येताच तिने नियम मोडल्याची चर्चा रंगली.
वन विभागाने दिलं स्पष्टीकरण
वाद वाढताच वन विभागाने यावर अधिकृत स्पष्टीकरण दिलं. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडीओ हा सफारीच्या प्रतिबंधित जंगल क्षेत्रातील नसून एंट्री पॉइंटच्या बाहेर शूट करण्यात आला होता. त्या ठिकाणी सामान्य हालचालींना परवानगी असल्याने रकुलने कोणताही नियम मोडलेला नाही.वन विभागाने पुढे सांगितलं की, रकुलने संरक्षित जंगल भागात प्रवेशच केला नव्हता. त्यामुळे वन्यजीव नियमांचे उल्लंघन केल्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
The alleged video being circulated is from outside the entry point of the Sanctuary area and not inside the restricted zone.@nkk_123 @choga_don pic.twitter.com/qeszY7YxJw
— DCFSasan-Gir (@dcfsasangir) May 10, 2026
तब्येत बिघडल्यामुळे रकुल परतली
माहितीनुसार, रकुल तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनल अॅक्टिव्हिटीसाठी गिर येथे पोहोचली होती.तिच्यासोबत आयुष्मान खुराना, वामिका गब्बी आणि इतर टीम सदस्य उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नॅशनल पार्कमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच रकुलची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे तिच्या टीमने तिला तातडीने तिथून बाहेर नेलं. व्हिडीओमध्येही रकुल काहीशी अस्वस्थ दिसत असून नंतर काही लोक आणि पोलिस अधिकाऱ्यांसोबत ती तिथून बाहेर जाताना दिसते.
‘पति पत्नी और वो 2’मुळे चर्चेत
रकुल प्रीत सिंहचा आगामी सिनेमा ‘पति पत्नी और वो 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सारा अली खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पति पत्नी और वो’चा हा सिक्वेल असून ट्रेलर रिलीज झाल्यापासून सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.






















