एक्स्प्लोर

राजपाल यादव यांना यापूर्वीही दोनदा झालेला तुरुंगवास; कोट्यवधींची मालमत्ता जप्त, एका चित्रपटामुळे कर्जाचा फास आवळला

पण या सगळ्यात  एक प्रश्न उपस्थित केलं जातोय की, राजपाल स्वतःची मालमत्ता विकून हा वाद मिटवू शकत नाहीत का?

Rajpal Yadav: सध्या बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) तिहार कारागृहात असून त्यांच्या अडचणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. आर्थिक संकटामुळे ते अडचणीत सापडले असून उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अभिनेत्यानं तिहार तुरुंगात जाऊन सरेंडर केलं आहे. परिस्थितीपुढे हतबल झालेल्या राजपाल यादवनं आपल्याकडे पैसेच नसल्याचं मान्य केलेलं. तसेच,  मी काय करावं? माझ्याकडे पैसेच नाहीत... मला दुसरा कोणताही उपाय दिसत नाही..., असंही म्हटलेलं.  त्यांच्या मदतीसाठी अभिनेता सोनू सूद पुढे आला.अनेक कलाकारांनी त्चायाला आर्थिक मदतही ऑफर केल्याचं समोर आलं. पण या सगळ्यात  एक प्रश्न उपस्थित केलं जातोय की, राजपाल स्वतःची मालमत्ता विकून हा वाद मिटवू शकत नाहीत का?

तर झालं असं होतं की, ‘अता-पता लापता’ हा चित्रपट तयार करण्यासाठी राजपाल यादव यांनी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रत्येकी 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र चित्रपट फ्लॉप ठरल्याने ते कर्ज फेडू शकले नाहीत. न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.

मालमत्तेचं काय झालं?

या प्रकरणात 2018 मध्ये त्यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास झाला होता. त्यानंतर 2024 मध्ये बँकेने त्यांच्या शाहजहांपूर येथील कोट्यवधींच्या मालमत्तेवर जप्ती आणली गेली. जवळच्या सूत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार, 2005 मध्ये राजपाल यांनी आपल्या आई-वडिलांच्या नावावर ‘नवरंग गोदावरी एंटरटेनमेंट लिमिटेड’ ही प्रॉडक्शन कंपनी स्थापन केली होती आणि मुंबईतील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स शाखेतून 5 कोटींचे कर्ज घेतले होते. लिलावाच्या वेळी त्यांच्यावर सुमारे 11 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे सांगितले जाते. स्थानिकांच्या मते, बँक अधिकाऱ्यांनी इमारत घाईघाईत सील केली होती.

रंगभूमीपासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास

राजपाल यादव यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांत काम केले आहे. शिक्षणानंतर त्यांनी शाहजहांपूर येथे रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. 1987 ते 1992 या काळात त्यांनी थिएटरमध्ये काम करून अभिनयाची धार वाढवली. पुढे त्यांनी लखनऊ येथील भारतेंदू नाट्य अकादमी आणि दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेतले.

1999 मध्ये ‘दिल क्या करे’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘हंगामा’, ‘हलचल’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘गरम मसाला’, ‘भागम भाग’, ‘भूल भुलैया’, ‘फिर हेरा फेरी’, ‘चुप चुप के’, ‘पार्टनर’, ‘ढोल’, ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’, ‘कृष 3’, ‘वेलकम बैक’ आणि ‘भूल भुलैया 3’ यांसारख्या चित्रपटांत त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘भूत बंगला’ आणि ‘वेलकम 3’चा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget