एक्स्प्लोर

Dada First Look Out: सौरव गांगुलीच्या फिल्मचं पोस्टर रिलीज, नेटकरी संतापले, म्हणाले, 'बापरे हे काय? दादा एवढे वाईट दिवसही नाही आलेत...'

Dada First Look Out: 'दादा: द सौरव गांगुली स्टोरी' सिनेमाच्या पहिल्या पोस्टरमध्ये राजकुमार राव 'लॉर्ड्स'च्या बाल्कनीत उभा असलेला दिसतोय.

Dada First Look Out: भारतीय क्रिकेटमधील (Indian Cricket Team) सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुली यांचं आयुष्य आता मोठ्या पडद्यावर साकारलं जाणार आहे. त्यांच्या 'दादा: द सौरव गांगुली स्टोरी' (Dada: The Sourav Ganguly Story) या बायोपिकचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय. सिनेमाच्या 'फर्स्ट-लूक' पोस्टरमध्ये राजकुमार राव (Rajkummar Rao) मुख्य भूमिकेत दिसतोय. हा सिनेमा 14 मे 2027 रोजी रिलीज केला जाणार आहे. पण, हे पोस्टर नेटकऱ्यांना फारसं आवडलेलं दिसत नाही. कारण, पोस्टर रिलीज होताच, यावरुन टीकेचा सूर आवळला गेल्याचं पाहायला मिळतंय.  

राजकुमार रावचा 'फर्स्ट लूक' (Dada: The Sourav Ganguly Story First Look)

'दादा: द सौरव गांगुली स्टोरी' सिनेमाच्या पहिल्या पोस्टरमध्ये राजकुमार राव 'लॉर्ड्स'च्या बाल्कनीत उभा असलेला दिसतोय. त्यानं निळ्या रंगाची क्रिकेटची टीम इंडियाची पँट घातली असून तो 'टीम इंडिया'ची जर्सी हवेत फिरवताना दिसतोय. हे दृश्य 2002 मधील त्या ऐतिहासिक क्षणाचं चित्रण करतं, जेव्हा टीम इंडियानं 'नेटवेस्ट ट्रॉफी' जिंकल्यानंतर सौरव गांगुली यांनी लॉर्ड्सच्या बाल्कनीत आपली जर्सी काढून हवेत फिरवली होती. हा क्षण सौरव गांगुली यांच्या अख्ख्या करिअरमधला एका महत्त्वाच्या क्षणांपैकी एक आहे.

पोस्टरवर सिनेमाला 'दादा' असं नाव देण्यात आलंय, त्यासोबत "त्याने केवळ खेळ खेळला नाही, तर तो बदलून टाकला.." (He didn't just play the game; he changed it) ही टॅगलाईनही आहे. पोस्टर वर सिनेमा 14 मे 2027 रोजी थिएरर्समध्ये प्रदर्शित होणार असल्याचं नमूद करण्यात आलंय.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

पोस्टर प्रदर्शित होताच सुरू झाली ट्रोलिंग (Dada: The Sourav Ganguly Story Poster Trolled)

राजकुमार रावच्या लूकबद्दल अनेक चाहते उत्साही दिसत असले, तरी सोशल मीडियावरील एका मोठ्या वर्गाला तो या भूमिकेसाठी योग्य वाटत नाही. एका युजरनं लिहिलंय की, "हा कसला जोक आहे? चॅटजीपीटीनं (ChatGPT) यापेक्षा चांगलं एडिटिंग केलं असतं..." दुसऱ्या एका युजरनं टिप्पणी केलीय की, "नाही मित्रा, ही भूमिका दुसऱ्या कोणालातरी मिळायला हवी होती, तुला नाही..." आणखी एका युजरनं म्हटलंय की, "हे फोटोशॉप केल्यासारखं वाटतं, हे खरोखरंच अधिकृत पोस्टर आहे का?" 

दरम्यान, एका युजरनं असंही म्हटलंय की, "राजकुमार राव आपल्या भूमिकांमध्ये वाईट नसतो, पण तो या भूमिकेसाठी अजिबात साजेसा वाटत नाही..." अनेक युजर्सनी तर हे पोस्टर मागे घेण्याची मागणी केलीय. त्यांच्या मते, ते पाहून असं वाटतंय की, जणू काही डिझायनरनं आदल्या रात्रीच फोटोशॉप शिकलं असावं. तरीही, अनेक चाहत्यांचं असं मत आहे की, केवळ एका पोस्टरवरून अभिनेत्याचं मूल्यमापन करणं घाईचं ठरेल. आता सर्वांचं लक्ष सिनेमाचा टीझर आणि राजकुमार रावचं ट्रान्सफॉर्मेशन याकडे लागलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Influencer Attacked: LIVE स्ट्रिमिंग करताना प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर गोळीबार, वर्दळीच्या ठिकाणी झाला हल्ला; मोटारसायकलवरुन हल्लेखोर पळाले
LIVE स्ट्रिमिंग करताना प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर गोळीबार, वर्दळीच्या ठिकाणी झाला हल्ला; मोटारसायकलवरुन हल्लेखोर पळाले
Jan Nayagan Ott release: विजय थलपतीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; 'जन नायगन' आता घरबसल्या पाहा, पण कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?
विजय थलपतीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; 'जन नायगन' आता घरबसल्या पाहा, पण कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?
Gashmeer Mahajani Post Viral: 'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
Mamachya Govyala Jauya: मित्रांची धम्माल अन् गोव्यातील नजारा, 'मामाच्या गोव्याला जाऊया' सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद, विकेंडला जादू चालणार?
मित्रांची धम्माल अन् गोव्यातील नजारा, 'मामाच्या गोव्याला जाऊया' सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद, विकेंडला जादू चालणार?
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Embed widget