इन्स्टाग्राम अन् फेसबुकवर मुला-मुलींचे वेडे चाळे सुरु, त्यावर का बोलत नाहीत; राजेश्वरी खरातचा ट्रोलर्सना सवाल
Rajeshwari Kharat questions trollers : अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने ट्रोल करणाऱ्या लोकांना काही सवाल केले आहेत.

Rajeshwari Kharat questions trollers : "तुमच्याकडे पॉवर आहे, असं तुम्हाला वाटतं तर तुम्ही ती योग्य ठिकाणी वापरली पाहिजे. (Rajeshwari Kharat questions trollers) तुम्ही ट्रोलिंग केल्याने माझं काही नुकसान नाही, मात्र तुमच्याही आयुष्यात काही बदल होत नाहीये. तुमची पॉवर योग्य आणि सिरीयस ठिकाणी लावा. आपण आजकाल इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर पाहातो. तिथे मुला मुलींचे वेडे चाळे सुरु आहेत. तिथे कोणी काही का बोलत नाही? तिथे हे जाऊन बोलतील पण शेवटी त्याच गोष्टींकडे वळतील. हे चुकीचं आहे ना?", असा सवाल फँड्री फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने ट्रोल करणाऱ्या लोकांना केला आहे. (Rajeshwari Kharat questions trollers) ती राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होती. (Rajeshwari Kharat questions trollers)
राजेश्वरी खरात म्हणाली, माझ्या घरचे लोक, मित्र मैत्रिणी आहेत. मी घरात मोठी आहे, घरात लहान भाऊ आणि बहिणी आहेत. ते सुद्धा सोशल मीडियावर काय सुरु आहे हे पाहातात. माझे लहान बहिण भाऊ हे पाहून काय विचार करत असतील? नातेवाईक पण येऊन सांगतात लोकांनी असं म्हटलंय. तसं म्हटलंय. कुठेतरी वाटतं की, यामध्ये माझी चूक नाहीये. मी त्यांना सगळं सागत बसू सांगू शकत नाही. ते नॉर्मल आणि मिडल क्लास फॅमिलीमधील आहेत. त्यामुळे कमेंट्स सेक्शन बंद करते.
पुढे बोलताना राजेश्वरी खरात म्हणाली, मी मालिकांमध्ये काम करण्यासही प्रयत्न केले आहेत. मात्र, तिथे सिलेक्ट होऊन मी रिप्लेस झालेली आहे. माझ्यामागे कोणतं बॅनर किंवा नाव नसल्याने तसं झालंय. कित्येकदा रिप्लेस झालेली आहे. त्याचं मला दु:ख नाहीये. मी यातून शिकते आहे. (Rajeshwari Kharat questions trollers)
मी racism करत नाही पण एक सांगते की मी गोरीच आहे. माझा फँड्री सिनेमात एक शेड डाऊन केला होता. ते उन्हाळ्यात आणि विदर्भात शूट करण्यात आलं होतं. त्यावेळी मी इयत्ता 9 वीत होते. कशी काळजी घ्यायची हे देखील माहिती नव्हतं. त्यानंतर आजी-आईने सांगितलेले उपाय केले. पण नॉर्मली मी गोरीच आहे. तरीही मी गोरी कशी झाले? हे लोक विचारतात. (Rajeshwari Kharat questions trollers)
इतर महत्त्वाच्या बातम्या
जब्या आणि शालूचं लग्न झालंय का? राजेश्वरी खरात म्हणाली, मला ते सध्या गुपित ठेवायचंय























