Rajeshwari Kharat And Somnath Awghade: काळी चिमणी घावली लका, जब्याला शालू घावली! राजेश्वरी-सोमनाथच्या फोटोने चर्चांना उधाण
Rajeshwari Kharat And Somnath Awghade : आता राजेश्वरीने सोमनाथसोबतचा एक फोटो शेअर केला असून कशी वाटली जोडी असा प्रश्न चाहत्यांना विचारला आहे. त्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
Rajeshwari Kharat And Somnath Awghade : 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या फँड्री चित्रपटाची (Fandry Movie) आजही चर्चा होत असते. अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) आणि सोमनाथ अवघडे (Somnath Awghade) यांनी साकारलेल्या शालू आणि जब्या या व्यक्तीरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. आता पुन्हा एकदा जब्या-शालू ही जोडी चर्चेत आली आहे. राजेश्वरीने सोमनाथसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून चर्चांना उधाण आले आहे. चित्रपटात अपूर्ण असलेले प्रेम प्रत्यक्षात जब्याला मिळाले का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
अभिनेत्री राजेश्वरी खरात ही सोशल मीडियावर सक्रिय असते. राजेश्वरीकडून फोटो, व्हिडीओ शेअर केले जातात. चाहत्यांकड़ून या फोटोंवर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव होत असतो. आता राजेश्वरीने सोमनाथसोबतचा एक फोटो शेअर केला असून कशी वाटली जोडी असा प्रश्न चाहत्यांना विचारला आहे. त्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
एका युजरने काळी चिमणी घावली जब्याला असे म्हटले आहे. एका युजरने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना श्रेय देत नागराज सरने बनादी जोडी असे म्हटले. काहींनी फँड्री चित्रपटातील गाणी पोस्ट केली आहेत. तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला, माझा जब्या ग जब्या शालू वर मरतो अशा कमेंट्सही काहींनी केल्या आहेत. माझा जब्या ग जब्या शालू वर मरतो असा प्रश्नही एकाने केला आहे.
View this post on Instagram
शालू-जब्या रिलेशनशीपमध्ये?
मागील वर्षीदेखील राजेश्वरी आणि सोमनाथ यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये दोघे रोमँटिक अंदाजात दिसून आले. या व्हिडिओत जब्या बुलेटवर बसला असून त्याच्याकडे शालू येते आणि त्याच्या कुशीत विसावते. राजेश्वरीने हा व्हिडीओ पोस्ट करताना त्यावर रेड कलरमध्ये लव्ह इमोजी टाकला होता. त्यामुळे हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा होती.
View this post on Instagram
रील शूट की चित्रपट?
काही वर्षांपूर्वी सोमनाथ आणि राजेश्वरी यांची जोडी चित्रपटात झळकणार असल्याचे वृत्त होते. या चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आले नव्हते. मात्र, चित्रीकरण सुरू असल्याचे म्हटले गेले होते. तर, सोमनाथ आणि राजेश्वरी सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी रील तयार करत होते. त्या दरम्यान हा फोटो काढला असल्याचे म्हटले जात आहे. या दोघांच्या फोटो मागे एकजण मोबाईल कॅमेऱ्यातून शूट करत असल्याचे दिसत आहे.