एक्स्प्लोर

Raja Shivaji Teaser Out Netizens Reactions: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'चा टीझर पाहून चाहत्यांना 'तो' सिनेमा आठवला; कुणाकडून कौतुक, तर कुणाकडून टोमणे

Raja Shivaji Teaser Out Netizens Reactions: विक्की कौशलनं 'छावा'मधून संभाजी महाराजांची कथा मांडली होती, जी प्रचंड गाजली. आता रितेश देशमुख शिवाजी महाराजांची कथा घेऊन आले असून त्यांनीच या सिनेमाचं दिग्दर्शनही केलंय.

Raja Shivaji Teaser Out Netizens Reactions: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) जीवनावर आधारित 'राजा शिवाजी' हा नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांसमोर येतोय. नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला असून तो पाहून अंगावर काटा येतो. टीझरमध्ये रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसतोय. याशिवाय संजय दत्त (Sanjay Dutt), विद्या बालन (Vidya Balan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दमदार अ‍ॅक्शन आणि युद्धदृश्यांनी भरलेला हा टीझर (Raja Shivaji Teaser) प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. विक्की कौशलनं 'छावा'मधून संभाजी महाराजांची कथा मांडली होती, जी प्रचंड गाजली. आता रितेश देशमुख शिवाजी महाराजांची कथा घेऊन आले असून त्यांनीच या सिनेमाचं दिग्दर्शनही केलंय.

'राजा शिवाजी'च्या टीझरमध्ये काय खास? (Raja Shivaji Teaser Out)

'राजा शिवाजी' सिनेमाच्या टीझरची सुरुवात संजय दत्तच्या पात्रानं होते, जो मुघल सेनेच्या बाजूनं लढताना म्हणतो, "नावापुढे 'राजा' लावल्यानं कोणी राजा होत नाही. मराठ्यांच्या नशिबात मृत्यू किंवा गुलामीच लिहिलीय..." त्यानंतर महेश मांजरेकर यांची एंट्री होते, जे मराठ्यांच्या बाजूनं लढताना दिसतात, मात्र त्यांची फसवणूक करून हत्या केली जाते. मृत्यूपूर्वी ते म्हणतात, "पाठीवर वार करण्याची तुमची फितरत मराठे ज्या दिवशी ओळखतील, तेव्हा तुमच्या अंताची सुरुवात असेल..."

रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत (Riteish Deshmukh As Chhatrapati Shivaji Maharaj)

'राजा शिवाजी' सिनेमाच्या टीझरमध्ये अभिषेक बच्चनची दमदार 'रि-एन्ट्री' पाहायला मिळतेय. आपले डायलॉग आणि ॲक्शन सीन्सनी त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकलीत. या सिनेमात तो शिवाजी महाराजांचे पुत्र, संभाजी शहाजी भोसले यांची भूमिका साकारतोय. त्यानंतर रितेश देशमुखची धमाकेदा एन्ट्री होते, तो शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, मराठ्यांसाठी आणि आपल्या राज्यासाठी लढताना दिसून येतो. जेनेलिया देशमुख ही शिवाजी महाराजांची पत्नी, साईबाई यांची भूमिका साकारतेय, तर विद्या बालनही एका अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतेय.

'राजा शिवाजी'च्या टीझरवर काही प्रेक्षक नाराज (Raja Shivaji Teaser)

'राजा शिवाजी'चा टीझर अत्यंत प्रभावी आहे आणि चाहत्यांनी त्याचं कौतुकही केलं आहे, तरीही टीझर पाहून काही प्रेक्षकांना असं वाटलं की, या टीझरमध्ये 'छावा'चा तो खास बाज किंवा 'फील' (Vibe) काहीसा कमी पडलाय. काहींचं असं म्हणणं होतं की, 'छावा' सिनेमानं एक स्टँडर्ड सेट केलाय, त्यामुळे 'राजा शिवाजी'कडून अपेक्षा वाढलेल्या. अनेकांनी असंही लिहिलंय की, "छावा' कुठे आणि हे कुठे..."

'राजा शिवाजी'ची स्टारकास्ट (Raja Shivaji Movie Star Cast)

'राजा शिवाजी'मध्ये हिंदी आणि मराठी कलाकारांची मोठी फौज आहे. संजय दत्त, रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, विद्या बालन आणि अभिषेक बच्चन यांच्यासह महेश मांजरेकर, बोमन इराणी, फरदीन खान, अमोल गुप्ते, सचिन खेडेकर आणि भाग्यश्री यांसारखे कलाकार यात दिसणार आहेत. या सिनेमाची निर्मिती जिओ स्टुडिओजनं केली आहे. याच बॅनरखाली नुकताच प्रदर्शित झालेला 'धुरंधर 2' हा सिनेमाही तयार करण्यात आला होता.

'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानचा कॅमिओ (Salman Khan Cameo In 'Raja Shivaji')

'राजा शिवाजी'मध्ये सलमान खान यांचीही विशेष भूमिका असणार आहे. त्यांनी 2025 मध्येच या भूमिकेचे शूटिंग पूर्ण केल्याचं समजतं. चर्चेनुसार, ते या सिनेमात जीवा महाला यांची भूमिका साकारणार आहेत. जीवा महाला हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक आणि मराठा सैन्यातील पराक्रमी योद्धे होते. दरम्यान, सिनेमाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.  

टीझर पाहिलात?

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Chhaava 2 Vicky Kaushal As Shahu Maharaj: बॉक्स ऑफिस पुन्हा हादरणार, 'छावा'चा सीक्वेल येणार? शाहू महाराजांच्या भूमिकेत झळकणार विक्की कौशल

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Part 1 Ranbir Kapoor: 'रामायण: पार्ट 1' मधून प्रेक्षकांना मोठं सरप्राइज, रणबीर कपूर साकारतोय डबल रोल, प्रभू श्रीराम व्यतिरिक्त 'या' भूमिकेत झळकणार
'रामायण: पार्ट 1' मधून प्रेक्षकांना मोठं सरप्राइज, रणबीर कपूर साकारतोय डबल रोल, प्रभू श्रीराम व्यतिरिक्त 'या' भूमिकेत झळकणार
Medha Manjrekar cancer: 'लोक मला देवाचे फोटो पाठवायचे...', मेधा मांजरेकरांनी सांगितला कॅन्सर निदान झाल्यानंतरचा 'तो' किस्सा, म्हणाल्या...
'लोक मला देवाचे फोटो पाठवायचे...', मेधा मांजरेकरांनी सांगितला कॅन्सर निदान झाल्यानंतरचा 'तो' किस्सा, म्हणाल्या...
Kushal Badrike On Marathi Movie Show In Theaters: आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही, कुशल बद्रिके हळहळला
आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही; कुशल बद्रिके हळहळला
Salman Khan Treatment: 'स्वत:च्या डोक्यावर इंजेक्शन...', सलमान खाननं घेतलीय 'ती' ट्रिटमेंट, जवळचा मित्र म्हणाला, 'तो बिर्याणी खात...'
'स्वत:च्या डोक्यावर इंजेक्शन...', सलमान खाननं घेतलीय 'ती' ट्रिटमेंट, जवळचा मित्र म्हणाला, 'तो बिर्याणी खात...'

व्हिडीओ

Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील चक्रावणारी घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील चक्रावणारी घटना
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget