एक्स्प्लोर

Salman Khan Treatment: 'स्वत:च्या डोक्यावर इंजेक्शन...', सलमान खाननं घेतलीय 'ती' ट्रिटमेंट, जवळचा मित्र म्हणाला, 'तो बिर्याणी खात...'

Salman Khan Undergoing Hair Treatment: सलमान खानवर नक्की कोणती ट्रिटमेंट सुरू? मित्र शैलेंद्र म्हणाला....

Salman Khans Hair Treatment Secret: सलमान खानच्या (Salman Khan) एका व्हिडीओने सोशल मीडियात धुमाकूळ घातला होता. हा व्हिडीओ पाहून, नेटकऱ्यांनी सलमान खानच्या तब्येतीविषयी विचारपूस केली. अलिकडेच सलमान खानचा मित्र आणि चित्रपट निर्माता शैलेंद्र सिंह याने, सलमान खानला गलॅक्सी अपार्टमेंटमध्ये (Bandra Galaxy Apartment) भेटल्याचा किस्सा सांगितला. 'सलमान खानच्या केसांवर ट्रिटमेंट (Hair treatment) सुरू होते, तेव्हा तो बिर्याणीचा आस्वाद घेत होता', असं त्याने सांगितलं. नेमका किस्सा काय? जाणून घेऊयात. 

शैलेंद्र सिंहने अलिकडेच साइरस ब्रोचा याच्या पॉडकास्टमध्ये  मुलाखत दिली होती.  या पॉडकास्टमध्ये त्याने सलमान खानसोबतचा किस्सा सांगितला. तो म्हणाला, 'एके दिवशी मी सलमान खानला त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये भेटायला गेलो होतो. आम्ही सोमवारी रात्री पार्टी करायचो', असं शैलेंद्रने पॉडकास्टमध्ये सांगितलं. 'त्यावेळी सलमान खान डायनिंग टेबलवर बसून जेवत होता. आणि स्वत:ला आरशात बघत होता.  त्याला जेवताना स्वत:ला आरशात बघायला आवडतं'.

सलमान खानवर कोणती ट्रिटमेंट सुरू? (Salman Khan Hair Treatment)

'जेव्हा मी तिथे बसलो होतो. तेव्हा तिथे एक माणूस मेडिकल इक्विपमेंट्स घेऊन आला होता. त्या व्यक्तीने तातडीने सलमान खानवर ट्रिटमेंट करायला सुरुवात केली. आम्हाला कोणताही व्यत्यय न आणता त्याने उपचाराला सुरुवात केली', असं सलमान खानच्या मित्राने सांगितलं. शैलेंद्रने सांगितलं की,  'सलमान खान बसून बिर्याणी खात होता.  तुम्हा सर्वांना माहितीच असेल की, सलमानला खायला खूप आवडतं. विशेषत:  थोडे ड्रिंक्स घेतल्यानंतर...'.

'अचानक एक माणूस आला. त्याने हातात हातमोजे घातले.  एक सुई काढली.  त्याच्या स्कॅल्पमध्ये इंजेक्शन टोचायला सुरुवात केली. मी हे सगळं आरशातून पाहत होतो. तसेच विचार करत होतो, की हे नेमकं काय चाललंय?',  असं शैलेंद्र म्हणाला.  यानंतर शैलेंद्रने सलमान खानला विचारले की हे नक्की काय चाललंय? त्यावर तो म्हणाला की, 'मित्रा, हीच स्टार बनण्याची किंमत आहे.  पूर्ण उपचार सुरु असताना, तो सतत खात होता', असं शैलेंद्र म्हणाला.

शैलेंद्रला नंतर कळलं की, सलमान खानवर प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरेपी सुरु होती.  ही एक अशी ट्रिटमेंट आहे, ज्यामध्ये केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी व्यक्तीच्या स्वत:च्या रक्तातून काढलेल्या प्लाझ्माचा वापर केला जातो. 'तेव्हा मला ठाऊक नव्हतं की, नेमकं काय चाललंय?  मला वाटलं की, सगळेच करतात. ऋतिक रोशनही करतो. जसं जसं तुमचं वय वाढतं,  तस तसं तुमचे केस विरळ होतात. तुम्हाला हे सगळं करावं लागतं', असं शैलेंद्र म्हणाला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

शाहरुख खानचा लेक आर्यन खान मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट, 'ती' आहे तरी कोण? दोघांच्या अफेअरची चर्चा

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget