एक्स्प्लोर

Raja Shivaji BO Day 18 Worldwide: 'राजा शिवाजी'ची बॉक्स ऑफिसवर सिंहगर्जना; 18 वा दिवसही दणक्यात गाजवला, वर्ल्डवाईड कमाई किती?

Raja Shivaji Box Office Collection Day 18: 'राजा शिवाजी' सिनेमानं वर्ल्डवाईड धमाकेदार कमाई केली असून लवकरच आता तो 'सैराट'चा रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे.

Raja Shivaji Box Office Collection Day 18: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमा (Raja Shivaji Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर (Raja Shivaji Box Office Collection) अक्षरशः धुमाकूळ घालतोय. अनेक नवे सिनेमे येऊनही या ऐतिहासिक सिनेमाची क्रेझ कायम आहे. कोणताही नवा सिनेमा त्याच्या कमाईवर परिणाम करू शकलेला नाही. प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे, रिलीज होऊन अठरा दिवस उटूनही रितेश देशमुखच्या सिनेमानं इतिहास रचला आहे. 'राजा शिवाजी' सिनेमा आता मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाईल करणाऱ्या सिनेमांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे या सिनेमाच्या तिसऱ्या सोमवारच्या कमाईकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. 

'राजा शिवाजी' मराठीतील वर्ल्डवाइड सर्वात मोठी फिल्म (Raja Shivaji BO Collection

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय. या सिनेमानं नव्यानं रिलीज झालेल्या फिल्म्सना आपली मानही वर काढू दिलेली नाही. फिल्म रिलीज झाल्यापासून ते आजपर्यंत या सिनेमानं प्रत्येक दिवसी आपली पकड बॉक्स ऑफिसवर आणखी मजबूत केली आहे. त्यातच सलग अठराव्या दिवशी 'राजा शिवाजी' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर किती कमाई केलीय सविस्त जाणून घेऊयात...

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

'राजा शिवाजी'  18 व्या दिवशी किती केली कमाई? (Raja Shivaji Net Collection)

'राजा शिवाजी' सिनेमाला रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळतंय, सलग दोन आठवडे फिल्मनं चांगली कमाई केलीय. तरी तिसऱ्या आठवड्यात अनेक नव्या फिल्मच्या स्पर्धेला सामोरं जावं लागलं तरी, या फिल्मनं केवळ दमदार कामगिरीच केली नाही तर त्याच्या कमाईतही वाढ दिसून आली आहे. फिल्मच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास, 11.35 कोटी रूपयांनी ओपनिंग केलेल्या 'राजा शिवाजी' सिनेमानं पहिल्या आठवड्यात 52.65 कोटी रुपये कमावले आहेत. 

दुसर्‍या आठवड्यात फिल्मनं 24.30 कोटींची कमाई केलीय. त्यानंतर फिल्मनं 15 व्या दिवशी 1.45 कोटी, 16 व्या दिवशी 2.70 कोटी आणि 17 व्या दिवशी 3.45 कोटी कमावलेत. आता सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी' सिनेमानं 18 व्या दिवशी 1.15 कोटींची कमाई केली आहे. याबरोबरच 'राजा शिवाजी'नं 18 व्या दिवशी भारतामध्ये नेट कलेक्शन 85.70 कोटी रुपये झाले आहे.  

'राजा शिवाजी'नं वर्ल्डवाइड रचला इतिहास...

2016 मध्ये, 'सैराट' फिल्मनं मराठी चित्रपटसृष्टीला पहिल्यांदाच जगभरात100 कोटींची कमाई केली. नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर स्टारर या रोमँटिक ट्रॅजेडीनं जगभरात 110 कोटी रुपयांची कमाई केली. केवळ चार कोटी रूपयांमध्ये बनलेला 'सैराट' भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला.

आता, तब्बल  10 वर्षांनंतर, 'राजा शिवाजी'नं 'सैराट'ला मागे टाकून आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट बनण्याचा मान मिळवला आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित, 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं, निर्मात्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात 114.8 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून बॉक्स ऑफिसचे सर्व विक्रम मोडले असूनही तो चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे.

रितेश देशमुख लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती जिनेलिया देशमुख आणि ज्योती देशपांडे यांनी मुंबई फिल्म कंपनी आणि जिओ स्टुडिओच्या बॅनरसोबत केली आहे. या ऐतिहासिक नाटकात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते यांच्यासह रितेश आणि जेनेलिया मुख्य भूमिकेत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Drushya Adrushya Teaser Release: डोळ्यांवर विश्वास ठेवायचा की, मनावर...? पूजा सावंतची डोकं चक्रावणारी सस्पेन्स-थ्रीलर फिल्म, Teaser

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Himanshi Khurana: 'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
Box Office Collection: पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?
पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?
Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Embed widget