एक्स्प्लोर

Drushya Adrushya Teaser Release: डोळ्यांवर विश्वास ठेवायचा की, मनावर...? पूजा सावंतची डोकं चक्रावणारी सस्पेन्स-थ्रीलर फिल्म, Teaser

Drushya Adrushya Teaser Release: क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारे कथानक, आघाडीच्या कलाकारांचा सर्वोत्तम अभिनय आणि कुशल दिग्दर्शन असलेला 'दृश्य-अदृश्य' हा चित्रपट 19 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Drushya Adrushya Teaser Release: नेहमीच वेगळ्या धाटणीचे सिनेमे बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी सिनेसृष्टीत (Marathi Film Industry) पुन्हा एकदा एका ज्वलंत विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आपल्या डोळ्यांना दिसतं ते सत्य की, आपल्याला होणारे भास खरे या अनाकलनीय कोड्याचे उत्तर शोधणारा 'दृश्य-अदृश्य' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे.  

क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारे कथानक, आघाडीच्या कलाकारांचा सर्वोत्तम अभिनय आणि कुशल दिग्दर्शन असलेला 'दृश्य-अदृश्य' (Drushya Adrushya Teaser) हा चित्रपट 19 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 56 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव म्हणजेच 'इफ्फी'मध्ये या सिनेमानं जागतिक पातळीवरील प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यात यश मिळविलंय. त्यानंतर खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आलेल्या सिनेमाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

आरएसटी कॅनव्हास निर्मित 'दृश्य-अदृश्य' या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची (Thriller Movie) निर्मिती प्रद्योत पेंढारकर, अनिल वर्खडे, दत्ताजी थोरात, धनंजय थोरात, पृथ्वीराज खेडकर, युवराज खेडकर आणि अश्विनी खेडकर यांनी केली आहे. आजवर बऱ्याच आशयघन यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या मिलिंद लेले यांनी 'दृश्य-अदृश्य'चे दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शनासोबतच 'दृश्य-अदृश्य'चे कथा-पटकथा लेखन मिलिंद लेले यांनीच केले असून, संवाद अस्मिता कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. 'जे दिसतं तेच खरं असतं का?' हा प्रश्न विचारत 'दृश्य अदृश्य' या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. 

'25 लाख रुपयांच्या इन्सेन्टिव्हचं सिक्रेट' टिझरमधील रहस्य आणखी गडद करणारे असून, चित्रपटाबाबत कुतूहल जागविणारं आहे. 'डोळ्यांवर विश्वास ठेवायचा की मनावर?' हा प्रश्न उपस्थित करीत 'दृश्य अदृश्य'चा टिझर मनातील गुंतागुंत आणखी वाढवतो. भास आणि सत्य यात खूप मोठं अंतर असल्याचे टिझर अधोरेखित करतो. 'माणूस ओळखणं कठीण की सत्य?' हा टिझरमध्ये विचारलेला प्रश्नही खोलवर विचार करायला लावतो. 'दृश्य-अदृश्य'चा टिझर खऱ्या अर्थाने चित्रपटाबाबत उत्सुकता वाढविणारा असून, प्रदर्शनानंतर लगेचच सोशल मीडियावर टिझरला नेटकऱ्यांचा तूफान प्रतिसाद मिळत आहे. 

मुख्य भूमिकेतील अभिनेत्री पूजा सावंत या चित्रपटात आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा अतिशय वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. पूजाच्या जोडीला अशोक समर्थ, सुव्रत जोशी, हार्दिक जोशी, अक्षया गुरव, विद्याधर जोशी, केया इंगळे आदी तगड्या कलाकारांची फळी आहे. गीतकार वलय मुळगुंद यांच्या गीतरचना संगीतकार आशिष मुजुमदार, देवदत्त बाजी यांनी गायिका प्रियांका बर्वे आणि निधी हेगडे यांच्या आवाजात संगीतबद्ध केल्या आहेत. नृत्य दिग्दर्शन दीपक देबनाथ यांनी केले असून, नितिन बोरकर यांनी कला दिग्दर्शन केले आहे. अमोल साळुंके यांनी छायाचित्रण केले असून, सचिन वाघ यांनी संकलन केले आहे. महेश बराटे यांची रंगभूषा, तर किर्ती जंगम-जोशी यांची वेशभूषा आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Deool Band 2 Trailer Snehal Tarde, Mohan Joshi: 'देशात सगळं ओरिजनल, डुप्लिकेट फक्त शेतकरी...'; शेतकरी महिला घेणार स्वामींची परीक्षा, 'देऊळ बंद 2'चा दमदार ट्रेलर पाहिलात?

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget