एक्स्प्लोर

Box Office Collection: पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?

सनी देओलच्या ‘बटवारा1947’च्या कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी वाढ झाली आहे. जाणून घ्या सिनेमाने किती कमाई केली...

Batwara 1947 Worldwide Collection Day 2: सनी देओलचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘बटवारा 1947’ (Batwara 1947) बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. पहिल्या दिवशी सिनेमाची कमाई काहीशी निराशाजनक राहिली असली, तरी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्टला सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ पाहायला मिळाली. विशेष म्हणजे शोजची संख्या कमी होऊनही सिनेमाच्या कमाईचा वेग अडीच पटीने वाढला आहे. ‘बटवारा 1947’ आणि इमरान हाशमीचा ‘आवारापन 2’ (Awarapan 2) हे दोन्ही सिनेमे 14 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. या मोठ्या क्लॅशचा फटका पहिल्या दिवशी सनी देओलच्या सिनेमाला बसला. ‘आवारापन 2’च्या तुलनेत तब्बल तीन पट कमी कमाई करत ‘बटवारा 1947’ने बॉक्स ऑफिसवर सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत चांगलीच वाढ झाली.

‘बटवारा 1947’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

राजकुमार संतोषी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘बटवारा 1947’ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास 5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. तर परदेशातील मार्केटमधून सिनेमाने सुमारे दीड कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या दिवशी सिनेमाची वर्ल्डवाइड कमाई 8 कोटींच्या पुढे गेली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत अडीच पट वाढ झाली. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, 15 ऑगस्टला सिनेमाने भारतात जवळपास 13.50 कोटी रुपयांची कमाई केली. परदेशातही सिनेमाच्या कमाईत वाढ झाली असून दुसऱ्या दिवशी जवळपास 2 कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचं सांगितलं जात आहे.

दोन दिवसांमध्ये ‘बटवारा 1947’चा एकूण नेट कलेक्शन 19.25 कोटी रुपये झालं आहे. तर सिनेमाचं ग्रॉस कलेक्शन जवळपास 22.91 कोटी रुपये आहे. परदेशातील कमाईचा आकडा आतापर्यंत 3.5 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.या आकडेवारीनुसार, सनी देओलच्या ‘बंटवारा 1947’ने अवघ्या दोन दिवसांत जगभरात 26.41 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता रविवारच्या सुट्टीचा सिनेमाला किती फायदा होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर धुडगूस

दुसऱ्या दिवशी ‘बटवारा 1947’च्या कमाईत मोठी वाढ झाली असली, तरी सिनेमा ‘आवारापन 2’ला मागे टाकण्यात अपयशी ठरला आहे.दुसऱ्या दिवशी ‘आवारापन 2’ने भारतात जवळपास 33 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. दोन दिवसांत या सिनेमाची वर्ल्डवाइड कमाई तब्बल 72.90 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ने 15 ऑगस्टला दमदार कमबॅक केलं असलं, तरी सध्या बॉक्स ऑफिसच्या शर्यतीत ‘आवारापन 2’ आघाडीवर आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Box Office Collection: पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?
पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?
Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई
तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget