Rahul Deshpande Ex-Wife Social Media Post: 'तू माझ्या आयुष्यातील सर्वात बेस्ट व्यक्ती...'; घटस्फोटानंतर पहिल्यांदाच राहुल देशपांडेंसाठी पत्नीची पोस्ट
Rahul Deshpande Ex-Wife Social Media Post: घटस्फोटानंतर कित्येक महिन्यांनी राहुल देशपांडेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नेहा यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

Rahul Deshpande Ex-Wife Social Media Post: मराठीतील सुप्रसिद्ध गायक (Marathi Singer) राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांनी 17 वर्षांच्या सुखीसंसारानंतर आपल्या पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. स्वतः राहुल देशपांडेंनी सोशल मीडियावर पोस्ट करुन यासंदर्भात माहिती दिलेली. अशातच घटस्फोट (Divorce) होऊन काही महिन्यांनंतर गायकानं याबाबत माहिती चाहत्यांना दिलेली. त्यापूर्वी गायकाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत फारसं कुणाला काहीच ठाऊक नव्हतं. राहुल देशपांडेच्या घटस्फोटानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलेला. तसेच, ज्यावेळी राहुल देशपांडेंनी घटस्फोटाबद्दल जाहीर केले, त्यावेळीच त्यांनी स्पष्ट म्हटलेलं, मी पत्नीसोबत घटस्फोट घेतला असला तरीही ती कायमच माझी मैत्रिण राहिल. त्यावेळी राहुल देशपांडेंची एक्स पत्नी नेहा यांनी काहीच भाष्य केले नव्हतं. अशातच आता कित्येक महिन्यांनी राहुल देशपांडेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नेहा यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

राहुल देशपांडेसोबतच्या घटस्फोटानंतर नेहा पहिल्यांदाच व्यक्त झाल्यात. इंस्टास्टोरीला एक फोटो शेअर करत नेहा यांनी राहुल देशपांडे यांच्यासोबतचा खास फोटो शेअर केला. या फोटोमध्ये राहुल आणि नेहा यांची मुलगी देखील दिसत आहे. हा फोटो शेअर करत नेहा यांनी राहुल देशपांडेंना म्हटले की, तू माझ्या आयुष्यातील सर्वात बेस्ट व्यक्ती आहेस. तुझा प्रत्येक दिवस आनंदी जावो… राहुलसाठी ही पोस्ट शेअर करण्याचे खास कारणही आहे.
राहुल देशपांडेच्या वाढदिवसानिमित्त घटस्फोटीत पत्नीनं पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच नेहा यांनी राहुल देशपांडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. नेहा यांची ही पोस्ट चांगली व्हायरल होतेय. घटस्फोटानंतर राहुल देशपांडे यांनी सांगितलेलं की, पत्नी नेहा कायमच माझी मैत्रिणी राहणार आहे... अशातच आता नेहा यांच्या पोस्टनंतर त्यादेखील घटस्फोटानंतरही राहुल देशपांडेसोबतचं मैत्रिचं नातं जपत असल्याचं स्पष्ट होतंय.






















