Pushpa 2 Box Office Collection Day 31: अजूनही अल्लू अर्जुनचा बॉक्स ऑफिसवर दबदबा; 'पुष्पा 2'ची पाचव्या शनिवारी भरपूर कमाई, तरीही 1200 कोटींचा क्लब दूर
Pushpa 2 Box Office Collection : 'पुष्पा 2: द रुल' ची उत्कृष्ट कमाई पाहता, 31व्या दिवशी हा चित्रपट भारतात 1200 कोटी क्लबमध्ये सामील होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, हे होऊ शकलं नाही.
Pushpa 2 Box Office Collection Day 31: 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2 The Rule) रिलीज होऊन एक महिना उलटला, तरीदेखील अजून बॉक्स ऑफिसवरचा (Box Office Collection) त्याचा ताबा काही सुटलेला नाही. अजूनही सगळीकडे पुष्पाचाच बोलबाला आहे. अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर (Box Office) दररोज 3 ते 6 कोटींची कमाई करत आहे. आता 1200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेण्याकडे निर्मात्यांची नजर आहे. अशातच रिलीजनंतरच्या पाचव्या शनिवारी उत्कृष्ट कलेक्शन होऊनही चित्रपट 1200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेऊ शकलेला नाही. पुष्पासाठी अजूनही 1200 कोटींचा क्लब काही पावलं दूर आहे.
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रुल'नं पहिल्या आठवड्यात 725.8 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटानं दुसऱ्या आठवड्यात 264.8 कोटी रुपये, तिसऱ्या आठवड्यात 129.5 कोटी रुपये आणि चौथ्या आठवड्यात 69.65 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. पाचव्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी (30 व्या दिवशी) चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 3.75 कोटी रुपयांची कमाई केली. आता 31 व्या दिवशी चित्रपटाला वीकेंडचा फायदा मिळाला असून 5.5 कोटींची कमाई केली आहे. पण, तरीही अजून 1200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेण्याचं स्वप्न मात्र अधुरं राहिलं आहे.
अल्लू अर्जुनचा चित्रपट 1200 कोटींपासून काही पावलं दूर
'पुष्पा 2: द रुल'ची उत्कृष्ट कमाई पाहून, 31व्या दिवसाच्या कलेक्शनसह हा चित्रपट भारतातील 1200 कोटी क्लबमध्ये अगदी सहज प्रवेश करेल असं सर्वांना वाटलं नव्हतं. पण, बॉक्स ऑफिसवर वादळाप्रमाणे कमाई करत असलेला पुष्पाला 1200 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. 31व्या दिवसाच्या कमाईसह चित्रपटाचं एकूण कलेक्शन 1199 कोटी रुपये झालं आहे. म्हणजेच, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा चित्रपट केवळ 1 कोटी कमी असल्यामुळे 1200 कोटींच्या क्लबचा भाग होऊ शकला नाही.
View this post on Instagram
'पुष्पा 2: द रुल'चा जगभरात डंका
सुकुमार दिग्दर्शित'पुष्पा 2: द रुल' या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटानंही जगभरातील बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला आहे. अनेक चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही, चित्रपटानं जगभरात 1800 चा टप्पा ओलांडला आहे आणि 'बाहुबली 2' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकलं आहे. आता हा चित्रपट आमिर खानच्या 'दंगल'चा रेकॉर्ड मोडण्याच्या दिशेनं पाऊल टाकत आहे. त्यामुळे येत्या काळात पुष्पा 1200 कोटींचा टप्पा ओलांडणार का? आणि पुष्पा आमिर खानच्या 'दंगल'चा रेकॉर्ड मोडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :