एक्स्प्लोर

Pushpa 2 Box Office Collection Day 4: 'पुष्पा 2'नं फक्त चारच दिवसांत पार केलं 'बाहुबली', 'गदर 2'चं लाईफटाईम कलेक्शन; आतापर्यंत एकूण गल्ला किती कोटींचा?

Pushpa 2 Box Office Collection Day 4: 'पुष्पा 2' सह, अल्लू अर्जुनचा विजयरथ फुल्ल हायस्पीडनं पुढे सरकत आहे, एवढंच नाहीतर बड्या स्टार्सच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचं आयुष्यभराचं कलेक्शनही पुष्पा त्याच्या वाईल्ड फायर अंदाजानं चिरडून टाकत आहे.

Pushpa 2 Box Office Collection Day 4: अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' प्रदर्शित झाला आणि चाहत्यांनी उड्या घेतल्या. अॅडव्हान्स बुकिंगमध्येच पुष्पानं भल्या भल्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना आपल्या कमाईनं पायदळी तुडवलं होतं. अशातच पहिल्या विकेंडमध्येही पुष्पा 2 नं अनेक मोठ्या चित्रपटांना खूप मागे टाकत विक्रम रचले आहेत. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट प्रदर्शित होऊन 4 दिवस झाले आहेत. या चित्रपटानं पहिल्या वीकेंडमध्ये चांगली कमाई केली. पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये रेकॉर्डब्रेक आकडे सादर करणाऱ्या या चित्रपटानं पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.

सुकुमार दिग्दर्शित तेलुगू ॲक्शन ड्रामा 'पुष्पा 2: द रुल' 5 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. हा चित्रपट 2021 च्या ब्लॉकबस्टर 'पुष्पा: द राइज'चा सिक्वेल आहे. या ॲक्शन थ्रिलरची चर्चा रिलीज होण्याआधीच शिगेला पोहोचली होती आणि चित्रपटगृहांमध्ये धडकल्यानंतर तर बॉक्स ऑफिसवर तर चक्क वादळ आलं. 'पुष्पा 2: द रुल' रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. पुष्पाच्या झंझावातात अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांचे विक्रम मातीमोल झाले असून हा चित्रपट रोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. 'पुष्पा 2: द रुल'नं रिलीजच्या पहिल्याच विकेंडला किती कोटींचं कलेक्शन केले आणि कोणते रेकॉर्ड मोडले ते सविस्तर पाहुयात... 

'पुष्पा 2: द रूल' या चित्रपटानं अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. पहिल्याच विकेंडमध्ये पुष्पा 2 नं धुरळा उडवून दिला आहे. भल्या भल्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या आकड्यांना अगदी सहज मागे टाकलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

पुष्पा 2 नं चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कितीचा गल्ला केला? 

फक्त आणि फक्त दोनच दिवसांत 'पुष्पा 2: द रुल' (350.1 कोटी रुपये) च्या लाईफटाईम कलेक्शनला पार केल्यानंतर अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांनी बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. चित्रपटानं देशभरातीलच नाहीतर संपूर्ण जगभरातील चाहत्यांना भूरळ घातली आहे. चित्रपटानं ओपनिंग डेच्या दिवशी महाबंपर कलेक्शन केलं होतं. तेव्हापासूनच या चित्रपटावर जणू फक्त आणि फक्त पैशांचा पाऊस पडतोय. ओपनिंग विकेंडच्या दिवशी तर 'पुष्पा 2: द रुल'नं भल्या भल्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना धूळ चारली आणि बॉक्स ऑफिसवर कब्जा केला. सर्वात जलद वेगानं 500 कोटींचा आकडा पार करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. 

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2: द रुल' ने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच पहिल्या रविवारी 141.5 कोटी रुपयांची कमाई केली होती. यासोबतच 'पुष्पा 2: द रुल'नं रिलीजच्या चार दिवसांत 529.45 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटानं चार दिवसांत तेलगूमध्ये 198.55 कोटी रुपये, हिंदीमध्ये 285.7 कोटी रुपये, तामिळमध्ये 31.1 कोटी रुपये, कन्नडमध्ये 3.55 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 1.9 कोटी रुपये कमावले आहेत.

'पुष्पा 2' नं पेड प्रिव्यूमध्ये 10.65 कोटी कमावल्यानंतर, पुष्पा 2 नं पहिल्या दिवशी 164.25 कोटी रुपयांची कमाई केली आणि भारतीय चित्रपटांच्या इतिहासात ऐतिहासिक कामगिरी करत सर्वात मोठा ओपनर ठरला. यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई थोडी कमी झाली आणि चित्रपटानं सर्व भाषांमध्ये 93.8 कोटींची कमाई केली.

तिसऱ्या दिवशी वीकेंड जवळ येताच चित्रपटानं कमाईत वाढ दाखवली आणि पुन्हा 100 कोटींचा आकडा पार केला. या चित्रपटानं तिसऱ्या दिवशी 119.25 कोटींची कमाई केली. चौथ्या दिवशी रात्री 10:40 वाजेपर्यंत 141.5 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह चित्रपटानं आतापर्यंत एकूण 529.45 कोटी रुपयांची कमाई केली.

पुष्पा 2 नं 'हे' मोठे रेकॉर्ड मोडले

पुष्पा 2 नं केवळ बॉलीवूड, हॉलीवूड आणि दक्षिणेतील ऑल टाईम ब्लॉकबस्टर चित्रपट जसं की, एव्हेंजर्स एन्ड गेम (373.05 कोटी)चे रेकॉर्ड मोडले आहेत. त्यासोबतच दंगल चित्रपटाचं लाईफ टाईम कलेक्शन (387.38) ला देखील पछाडलं आहे. या चित्रपटानं केवळ वर उल्लेख केलेल्या मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्डच मोडले नाही तर अवतार (द वे ऑफ वॉटर) चं 391.4 कोटी रुपयांच्या कलेक्शनचा टप्पाही पार केला आहे. सालारचा पहिला पार्ट, रोबोटचा दुसरा पार्ट आणि बाहुबली (421 कोटी रुपये) यांच्या लाईफटाईम कलेक्शनचा आकडाही मागे टाकला.  या चित्रपटानं सनी पाजीच्या गदर 2 (525.7 कोटी) लाही मागे टाकलं आहे आणि शाहरुख खानच्या जवान (543.09 कोटी) ला लक्ष्य केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pushpa 2 Allu Arjun Fees: पुष्पासाठी मेकर्सनी पाण्यासारखा पैसा खर्च केला; जेवढी 'सिंघम अगेन'ची कमाई, त्याहून कित्येक पटींनी जास्त अल्लू अर्जुनची फी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Embed widget