Pushpa 2 Allu Arjun Fees: पुष्पासाठी मेकर्सनी पाण्यासारखा पैसा खर्च केला; जेवढी 'सिंघम अगेन'ची कमाई, त्याहून कित्येक पटींनी जास्त अल्लू अर्जुनची फी
Pushpa 2 Allu Arjun Fees: पुष्पा 2 हा बिग बजेट सिनेमा आहे, आपण सारेच जाणतो. पुष्पा 2 साठी मेकर्सनी पाण्यासारखा पैसा खर्च केलाय, यात काही शंका नाही.
Pushpa 2 Allu Arjun Rashmika Mandhana Fees: 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2 : The Rule) रिलीज होण्याच्या आधीपासूनच चर्चेत आहे. पुष्पा 2 यंदाच्या वर्षातला सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपट (Blockbuster Movie) ठरणार असं भाकीत आधीच चित्रपट समिक्षकांनी वर्तवलं आहे. आज संपूर्ण जगभरात हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच चित्रपटाबाबत आणि अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) स्टारडमची स्पष्टता आली. या चित्रपटानं आपल्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये तर तब्बल 100 कोटींचा गल्ला केला. एकंदरीतच पुष्पा 2 ची क्रेझ पाहता हा आतापर्यंतच्या दाक्षिणात्य चित्रपटांपैकी सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरणार, यात काही शंका नाही. पण, तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटात काम करणाऱ्या स्टारकास्टनं किती रुपयांचं मानधन घेतलं आहे?
पुष्पा 2 हा बिग बजेट सिनेमा आहे, आपण सारेच जाणतो. पुष्पा 2 साठी मेकर्सनी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. असं बोललं जातंय की, बॉलिवूडचा मल्टीस्टारर चित्रपट सिंघम अगेननं आतापर्यंत जेवढा गल्ला केला, तेवढी फी फक्त एकट्या अल्लू अर्जुननं घेतली आहे.
पॅन इंडियाचा 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट आज गुरुवारी थिएटरमध्ये दाखल होत आहे. अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत या चित्रपटानं विक्रम केला आहे. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाची आतापर्यंत 3176479 तिकिटं विकली गेली असून जवळपास 91.24 कोटींची कमाई झाली आहे. अल्लू अर्जुन या ॲक्शन चित्रपटात पुष्पा राजच्या भूमिकेत परत आला आहे, ज्यात रश्मिका मंदाना आणि फहद फासिल देखील आहेत. सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2' मध्ये अभिनय करण्यासाठी कलाकारांच्या फीसाठी खूप पैसा खर्च करण्यात आला आहे.
अल्लू अर्जुनची फी किती?
सर्वात आधी अल्लू अर्जुन या चित्रपटाचा लीड आहे. अल्लू अर्जुन संपूर्ण चित्रपटाच्या, कथेच्या केंद्रस्थानी आहे. अल्लू अर्जुननं संपूर्ण चित्रपटासाठी जेवढी मोठ्ठी रक्कम घेतली आहे की, तितकी कमाई अनेक बॉलिवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर करण्यासाठी कित्येक आठवडे घेतात. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याच्या फीबद्दल मीडियामध्ये चर्चा आहे की, अल्लू अर्जुननं 'पुष्पा 2: द रुल'साठी केवळ 25-50 कोटी रुपये नव्हे, तर 300 कोटी रुपये इतकी मोठी फी घेतली आहे. यासह तो भारतातील सर्वात महागड्या अभिनेत्यांच्या यादीत सामील झाला आहे.
श्रीवल्ली फेम रश्मिकानं किती कोटी घेतले?
आता या चित्रपटात श्रीवल्लीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाविषयी बोलायचं झालं तर, तिनं या चित्रपटासाठी मोठी रक्कम घेतल्याचं बोललं जात आहे. अल्लू आणि रश्मिकाची जोडी चाहत्यांच्या आवडत्या जोडींपैकी एक आहे. 'पुष्पा 2'साठी रश्मिका मंदान्नाच्या फीबद्दल बोलताना, अभिनेत्रीनं या चित्रपटासाठी 10 कोटी रुपये फी घेतल्याची माहिती मिळत आहे.
फहाद फासिलनं किती पैसे घेतले?
'पुष्पा 2' च्या ट्रेलरमध्ये फहाद फासिलच्या स्टाईलनं सर्वांची मनं जिंकली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फहादनं या चित्रपटासाठी 8 कोटी रुपये घेतले आहेत.
श्रीलीलानं किती फी घेतली?
श्रीलीलानं तिच्या उत्कृष्ट अभिनयानं दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःचं नाव कमावलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलीलानं तिच्या खास डान्स नंबर 'किसिक'साठी एकूण 2 कोटी रुपये शुल्क आकारलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :