Pushpa 2 Box Office Collection Day 33: 30 वर्षांत सर्वाधिक पाहिली गेलेली तिसरी फिल्म 'पुष्पा 2'; पहिल्या, दुसऱ्या क्रमांकावर कोण?
Pushpa 2 Box Office Collection Day 33: पुष्पा 2 नं गेल्या 30 वर्षांत तिसऱ्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटाचा किताबही पटकावला आहे. जाणून घ्या, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची स्थिती कशी आहे?
Pushpa 2 Box Office Collection Day 33: सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2 द रुल' रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. 5 डिसेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या पुष्पा 2 नं विक्रम रचण्याचा विक्रम रचला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अल्लू अर्जुनचं स्टारडम दररोज म्हटलं तरी नवनवे रेकॉर्ड रचत आहे.
रिलीज झाल्यानंतरच्या 33 व्या दिवशीही पुष्पा 2 नं बॉक्स ऑफिसवर बक्कळ गल्ला जमवला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 33 दिवस उलटल्यानंतरही पुष्पा 2 बॉक्स ऑफिस गाजवत आहे.
'पुष्पा 2' चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
Pushpa 2 नं प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे, 4 डिसेंबर रोजी पेड प्रीव्यूमधून 10.65 कोटी रुपये कमावले होते. तेव्हापासून आज सकाळी 10:50 वाजेपर्यंत चित्रपटानं किती कमाई केली, हे सविस्तर पाहुयात...
सॅक्निल्कच्या आकडेवारीनुसार, तक्त्यात दिलेले आकडे अंतिम नसून, यामध्ये बदल होऊ शकतात...
दिवस | कमाई (कोटी रुपयांमध्ये) |
पहिला दिवस | 164.25 |
दुसरा दिवस | 93.8 |
तिसरा दिवस | 119.25 |
चौथा दिवस | 141.05 |
पांचवा दिवस | 64.45 |
सहावा दिवस | 51.55 |
सातवा दिवस | 43.35 |
आठवा दिवस | 37.45 |
नववा दिवस | 36.4 |
दहावा दिवस | 63.3 |
अकरावा दिवस | 76.6 |
बारावा दिवस | 26.95 |
तेरावा दिवस | 23.35 |
चौदावा दिवस | 20.55 |
पंधरावा दिवस | 17.65 |
सोळावा दिवस | 14.3 |
सतरावा दिवस | 24.75 |
अठरावा दिवस | 32.95 |
एकोणविसावा दिवस | 13 |
विसावा दिवस | 14.5 |
एकविसावा दिवस | 19.75 |
बाविसावा दिवस | 9.6 |
तेविसावा दिवस | 8.75 |
चौविसावा दिवस | 12.5 |
पंचविसावा दिवस | 16 |
सव्विसावा दिवस | 6.8 |
सत्ताविसावा दिवस | 7.7 |
अठ्ठाविसावा दिवस | 13.25 |
एकोणतिसावा दिवस | 5 |
तिसवा दिवस | 3.75 |
एकतिसावा दिवस | 5.5 |
बत्तीसावा दिवस | 7.2 |
तेहत्तीसावा दिवस | 2.5 |
टोटल | 1208.7 |
पुष्पा 2 ची वर्ल्डवाईल्ड कमाई
पुष्पा 2 च्या निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये म्हटलं आहे की, या चित्रपटानं जगभरात 1831 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटानं बाहुबलीच्या जगभरातील कलेक्शनला (1788.06 कोटी) मागे टाकलं आहे आणि आता दंगलच्या जगभरातील कलेक्शनला (2070.3 कोटी) मागे टाकलं आहे.
View this post on Instagram
पुष्पा 2 जगभरात सर्वाधिक पाहिला जाणारा तिसरा भारतीय चित्रपट
पुष्पा 2 नं आणखी एक विक्रम केला. हा चित्रपट तिसरा सर्वाधिक पाहिला जाणारा भारतीय चित्रपट ठरला. याआधी 1994 मध्ये रिलीज झालेल्या सलमान खानच्या 'हम आपके है कौन है' या चित्रपटानं 7.4 कोटींचा गल्ला जमवला होता आणि बाहुबली 2 पहिल्या स्थानावर आहे, ज्यानं 10.7 कोटींचा गल्ला जमवला होता. आता या यादीत 6 कोटी कमाई करणारा पुष्पा 2 हा तिसरा चित्रपट ठरला आहे.
पुष्पा 2 सुपरडुपरहिट
पुष्पा 2 हा 2021 च्या सुपरहिट चित्रपट पुष्पा द राइजचा दुसरा भाग आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासोबत फहद फासिल देखील आहेत.