Pushpa 2 Box Office Collection Day 15: 'वनवास' आणि 'मुफासा' च्या रिलीजपूर्वीच घटली 'पुष्पा 2' ची कमाई; किती कमावले?
Pushpa 2 Box Office Collection Day 15: 'पुष्पा 2: द रूल' रिलीज होऊन 15 दिवस झाले आहेत आणि दररोज कोट्यवधींचा गल्ला जमवत आहे. मात्र, या चित्रपटानं 15 व्या दिवशी आतापर्यंतचं सर्वात कमी कलेक्शन केलं आहे.
Pushpa 2 Box Office Collection Day 15: 'पुष्पा 2: द रूल' (Pushpa 2: The Rule) 5 डिसेंबरला देशभरातील थिएटर्समध्ये रिलीज झाली होती. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा चित्रपट प्रदर्शित होऊन 15 दिवस झाले असून तो दररोज कोट्यवधींची कमाई करत आहे. मात्र, तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करताच चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. 'पुष्पा 2: द रुल' नं 15 व्या दिवशी आतापर्यंतचं सर्वात कमी कलेक्शन केलं आहे.
Sacknilk च्या रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2: द रुल' नं पहिल्या आठवड्यात 725.8 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात, चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 264.9 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करताच, 'पुष्पा 2: द रुल'ची कमाई मात्र बॉक्स ऑफिसवर मंदावली आणि केवळ 17.55 कोटींची कमाई केली. याआधी या चित्रपटानं कोणत्याही दिवशी इतकी कमाई केली नव्हती.
View this post on Instagram
'वनवास' आणि 'मुफासा'च्या रिलीजपूर्वीच घटली 'पुष्पा 2'ची कमाई
असं बोललं जात होतं की, 'पुष्पा 2: द रूल'नं 15व्या दिवशी एक हजार कोटींचा आकडा पार करेल. पण, पुष्पा मात्र असं करु शकली नाही. पंधराव्या दिवसाचं कलेक्शन मिळून आता 'पुष्पा 2: द रूल'ची एकूण कमाई 990.7 कोटी रुपये झाली होती. दरम्यान, 20 डिसेंबरला दोन नव्या फिल्म्स रुपेरी पडद्यावर येच आहेत. त्यामध्ये नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर स्टारर 'वनवास', तर म्युझिकल ड्रामा 'मुफासा: द लायन किंग' आज रिलीज होणार आहे. यापूर्वी 'पुष्पा 2: द रूल'चा दबदबा बॉक्स ऑफिसवर कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
कोणत्या भाषेत किती कलेक्शन?
सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट तेलुगू, तमिळ, हिंदुस्थानी, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं हिंदी आवृत्तीत सर्वाधिक कमाई केली आहे. 'पुष्पा 2: द रुल'नं हिंदीमध्ये 621.6 कोटी रुपये, तेलगूमध्ये 295.6 कोटी रुपये, तामिळमध्ये 52.4 कोटी रुपये, कन्नडमध्ये 7.13 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 13.97 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :